Gokhale Bridge Mumbai : आजपासून गोखले रोड पूल बंद राहणार; पण हे ६ पर्यायी मार्ग वापरा!

Gokhale Bridge Mumbai : आजपासून गोखले रोड पूल बंद राहणार; पण हे ६ पर्यायी मार्ग वापरा!

अंधेरी पूर्व आणि पश्चिमला जोडणारा गोखले पूल (Gokhale Bridge) आता पुनर्बांधणीसाठी बंद करण्यात आला आहे. परंतु, वाहतूककोंडीची चिंता लक्षात घेता ६ पर्यायी मार्ग देण्यात आले आहेत.
Published on

अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा गोखले पूल (Gokhale Bridge) आजपासून म्हणजेच ७ नोव्हेंबरपासून बंद राहणार आहे, याबाबतचे आदेश आता वाहतूक पोलिसांनी जारी केले आहेत. मात्र, यामुळे होणारी वाहतूककोंडी लक्षात घेता ६ पर्यायी मार्गदेखील दिले आहेत. हे पर्यायी मार्ग म्हणजे खार सबवे (खार), मिलन सबवे उड्डाण पूल (सांताक्रूझ), विलेपार्ले उड्डाणपूल(विलेपार्ले), अंधेरी सबवे (अंधेरी), बाळासाहेब ठाकरे उड्डाणपूल(जोगेश्वरी), मृणालताई गोरे उड्डाणपूल (गोरेगाव) हे असणार आहेत.

काही दिवसांपूर्वी मुंबई महानगरपालिका आणि मुंबई पोलिसांनी या पुलाची (Gokhale Bridge) पाहणी केली होती. हा पूल अंधेरी पूर्व आणि पश्चिममधील आणि उपनगरांतील सर्वाधिक रहदारी असणारा मार्ग आहे. मुंबई महानगरपालिकेने नियुक्त केलेल्या सल्लागार कंपनीने हा पूल वाहतुकीसाठी असुरक्षित असल्याचे सांगितले होते. त्यामुळे हा पूल बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. किमान दोन वर्ष हा पूल पुनर्बांधणीसाठी सर्वच प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद असेल, असे सांगण्यात आले आहे. हा पूल १९७५ साली बांधण्यात आला होता. २०१८च्या जुलैमध्ये या पुलाचा एक भाग कोसळला होता.

logo
marathi.freepressjournal.in