भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण

सोने-चांदी दरात मंगळवारी घसरण झाली असली तरी अजूनही सोने त्यांच्या उंच्चाकी पातळीपेक्षा ५,४७५ रुपये प्रति १० ग्रॅमने स्वस्त विकले जात आहे
भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण

जागतिक बाजारपेठेत वाढ होऊनही आज भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली. लग्नसराईचा हंगाम असूनही सोन्याची मागणी कमी होत असल्याने भाव ५०हजार ५००रु. जवळ आले आहेत. मंगळवारी सकाळी चांदीचा दरही ६० हजारांच्या आसपास आला आहे. मंगळवारी दिवसअखेरी मुंबई सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम ५०,६४७ रु. झाला आहे. सोमवारच्या सत्रातील भाव पाहता सोन्याच्या दर ७८८ रु. कमी झाला आहे. तर चांदीचा भाव मंगळवारी ६० हजारांच्या आत जात ५९,९६६ रु. झाला असून सोमवारच्या ६०,९८२ची तुलना करता चांदी १,०१६ रु.ने स्वस्त झाली आहे.

सोने-चांदी दरात मंगळवारी घसरण झाली असली तरी अजूनही सोने त्यांच्या उंच्चाकी पातळीपेक्षा ५,४७५ रुपये प्रति १० ग्रॅमने स्वस्त विकले जात आहे. ऑगस्ट २०२० मध्ये सोन्याचा भाव ५६,२०० रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची खरेदी वेगाने होत आहे. अमेरिकेत सोन्याचा भाव ७.९३ डॉलरच्या वाढीसह १८२८.३९ डॉलर प्रति औंस झाला. दुसरीकडे, चांदी ०.१६ डॉलरच्या वाढीसह २१.३१ डॉलर प्रति औंस झाला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in