
मुंबर्इ : देशातील सोन्याच्या वायदे बाजारात सध्या मंदीचे वातावरण सुरु आहे. सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीत फारसा चढ उतार नोंदवला जात नाह. जागतिक संकेतांमुळे एमसीएक्स या वायदेबाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत सपाट व्यवहार होण्याचे कारण आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात सराफा बाजारात संमिश्र व्यवसाय होताना दिसत आहे.
एमसीएक्सवर सोन्याचा भाव सुमारे ५० रुपयांच्या किंचित वाढीसह व्यवहार करत आहे. सोन्याचा दर ६०३९० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे. तर चांदीच्या दरात काहीशी घसरण झाली. एमसीएक्सवर चांदी २४ रुपयांनी घसरली आहे. १ किलो चांदीचा भाव प्रति किलो ७०६१० रुपये आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोने
आंतरराष्ट्रीय स्पॉट मार्केटमध्ये सोन्या-चांदीच्या किमतीत संमिश्र व्यवहार दिसून आला. मध्यपूर्वेतील तणावावामुळे सराफा बाजारात आज सपाट व्यवहार दिसून येत आहे. यामुळे कॉमेक्स वायदेबाजारात सोन्याची किंमत दोन आठवड्यांतील नीचांकी पातळीवर गेली आहे. कॉमेक्सवर सोन्याचा दर प्रति औंस १९७३ डॉलरवर सुरु आहे. तर चांदी प्रति औंस २२.५६ डॉलरवर आली आहे.
मुंबईतील सोन्याचे भाव
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत बुधवारी २४ कॅरेट सोन्याचा भाव ६०५२० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा भाव ५५४७७ रुपये प्रति १० ग्रॅम इतका आहे. तसेच बुधवारी सराफा बाजारात चांदीचा भाव ७०७२० रुपये प्रति १० ग्रॅम इतका आहे.