मुंबई सराफा बाजारात सोने ७१६ रुपयांनी महागले; चांदी स्वस्त

दिल्लीतील सराफा बाजारात गुरुवारी सोने ४९७ रुपयांनी वधारुन ५२,२२० रुपये प्रति दहा ग्रॅम झाले.
मुंबई सराफा बाजारात सोने ७१६ रुपयांनी महागले; चांदी स्वस्त

मुंबई सराफा बाजारात गुरूवारी सोन्याच्या दरात वाढ झाली. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या संकेतस्थळानुसार, गुरुवारी मुंबई सराफा बाजारात सोने ७१६ रुपयांनी महाग होऊन प्रति तोळा ५१,७९२ प्रति रुपये झाले आहे. तसेच चांदीच्या भावात किंचित घसरण झाली आहे. चांदी १४० रुपयांनी स्वस्त होऊन ६०,८९४ रुपये किलो झाला आहे.

दिल्लीतील सराफा बाजारात गुरुवारी सोने ४९७ रुपयांनी वधारुन ५२,२२० रुपये प्रति दहा ग्रॅम झाले. मंगळवारी हा दर ५१,७२३ रुपये होता. तसेच चांदीच्या दरात ८० रुपयांनी घट होऊन प्रति किलोचा दर ६१,६०५ रुपये झाला. मंगळवारी हा दर ६१,६८५ रुपये होता. धातू क्षेत्रात वाढ आणि रुपयाची घसरण याचा सराफा बाजारावर परिणाम झाल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजचे संशोधन विश्लेषक दिलीप परमार यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in