बेरोजगारांनसाठी खूशखबर; अग्निशमन दलात कायमस्वरूपी नोकरीची संधी

मुंबई अग्निशमन दलात सद्य:स्थितीत साडेतीन हजार अधिकारी व जवान कार्यरत आहेत
बेरोजगारांनसाठी खूशखबर; अग्निशमन दलात कायमस्वरूपी नोकरीची संधी

मुंबई अग्निशमन दलात कायमस्वरूपी अग्निशमकांची भरती होणार आहे. विशेष म्हणजे, ९०० अग्निशामकांची भरती कायमस्वरूपी होणार असून ३० हजारांपर्यंत पगार मिळणार आहे. त्यामुळे बेरोजगारांना नोकरीची संधी तर मिळणार आहे, त्याच बरोबर आपले कर्तृत्व दाखवण्याची संधी उमेदवारांना मिळणार आहे.

मुंबईत कुठलीही आपत्कालीन परिस्थिती घडली की, पहिल्या फोनची घंटा वाजते ती अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाची. जवान आहे त्या स्थितीत घटनास्थळी धाव घेत जीवाची बाजी लावत बचावकार्य सुरू करत अडकलेल्यांना सुखरूप बाहेर काढतात. मुंबई अग्निशमन दलात सद्य:स्थितीत साडेतीन हजार अधिकारी व जवान कार्यरत आहेत. मुंबईत गेल्या काही दिवसांत आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे; मात्र अग्निशमन दलातील ३५०० पदांपैकी तब्बल ३० टक्के पदे रिक्त आहेत. त्यामुळे उपलब्ध कर्मचारी वर्गावर मोठा ताण येतो. त्यामुळे अग्निशामकांची रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लेखी परीक्षा, मैदानी परीक्षेतील गुणांच्या आधारावर ही भरती होणार असून हेव्ही ड्रायव्हिंग लायसन्सचे गुणही मिळणार आहेत.

अशी राबवणार भरती प्रक्रिया

सध्या वाढलेल्या बेरोजगारीच्या पार्श्वभूमीवर या भरतीसाठी हजारो अर्ज येण्याची शक्यता आहे. त्यामुळे लेखी परीक्षा, मैदानी चाचणी, शारीरिक क्षमता वैद्यकीय चाचणी केल्यानंतर मेरिटनुसार अग्निशामकांची भरती केली जाणार आहे. भरतीसाठी ८०० मीटर धावणे, रोपवर चढणे आदी चाचण्या होणार आहेत.

महिलांना प्राधान्य

भरतीमध्ये ३० टक्के महिलांना आरक्षण असेल. यामध्ये महिला उमेदवार पात्र ठरले नाहीत तर पुरुष गटातून पात्र उमेदवारांची ही भरती केली जाईल. यानंतर निवड झालेल्या उमेदवारांना सहा महिन्यांचे ट्रेनिंग दिले जाईल. अग्निशमन दलाच्या मरोळ, वडाळा, बोरिवली प्रशिक्षण केंद्रांवर हे ट्रेनिंग होईल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in