जागा लिलाव प्रक्रियेस फेरीवाल्यांचा उत्तम प्रतिसाद

वांद्रे येथील माऊंट मेरीच्या दर्शनासाठी रोज एक लाख भाविक येण्याची शक्यता आहे.
जागा लिलाव प्रक्रियेस फेरीवाल्यांचा उत्तम प्रतिसाद

रविवारपासून सुरू होणाऱ्या वांद्रे येथील माऊंट मेरीच्या दर्शनासाठी रोज एक लाख भाविक येण्याची शक्यता आहे. भाविकांच्या सोयीसाठी पिण्याचे पाणी, फिरते शौचालय,ओल्या सुक्या कचऱ्यासाठी व्यवस्था तसेच ११ ते १८ सप्टेंबरदरम्यान आयोजिण्यात आलेल्या जत्रेत १०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर असणार आहे. तसेच देवीच्या जत्रेतून फेरीवाल्यांना रोजगार मिळावा यासाठी ३०० जागा पूजेचे साहित्य विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आल्याची माहिती एच पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त विनायक विसपुते यांनी दिली.

वांद्रे (पश्चिम) येथे शतकाहून अधिक परंपरा व वारसा लाभलेली माऊंट मेरीची यात्रा ११ ते १८ सप्टेंबर यादरम्यान संपन्न होणार आहे. गेली दोन वर्षे कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर ही यात्रा दोन वर्षे होऊ शकली नाही. कोविडची बंधने शिथिल झाल्यामुळे व धार्मिक स्थळे जनसामान्यांसाठी खुली केल्यामुळे तसेच सर्व सण, महोत्सव यात्रा निर्बंधमुक्त झाल्यामुळे सालाबाद प्रमाणे या वर्षी या यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे. उच्च न्यायालयाने निर्देशित केल्याप्रमाणे पूजेचे साहित्य, खेळणी इत्यादींच्या विक्रीसाठी माऊंट मेरी रोड, सेंट दि जॉन बॅप्टीस्टा रोड व केन रोड या ठिकाणी तात्पुरत्या पिचेसची लिलाव प्रक्रिया पूर्ण करुन सामान्य जनतेस व स्थानिक नागरीकांना या तात्पुरत्या जागा यात्रेच्या कालावधीत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

प्रथमोपचार, अग्निशमन दल सज्ज

संभाव्य आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी परिसरात पोलिसांसाठी देखरेख कक्ष, प्रथमोपचार कक्ष, अग्निसुरक्षा यंत्रणेसाठी स्वतंत्र कक्ष, बॅरिकेडिंग, सुरक्षा रक्षक, अग्निशमन दलाचे बंब तैनात करण्यात आलेले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in