
उत्तर भारतीय संघातर्फे आयोजित करण्यात आलेल्या महारक्तदान शिबिरास चांगला प्रतिसाद मिळाला आहे. जवळपास २००हून अधिक जणांनी या शिबिरामध्ये रक्तदान केले असून, संघाचे अध्यक्ष संतोष सिंह यांनीदेखील यावेळी रक्तदान केले. जे. जे. रुग्णालयाच्या सहकार्याने हे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. अमरजित मिश्र, संजय सिंह, राधेश्याम तिवारी यांच्यासह अनेकांनी या शिबिराला भेट दिली.