पाच दिवसांच्या बाप्पाला निरोप ; मुंबई महापालिकेसह पोलीस प्रशासनाकडून खबरदारी

चौपाट्यांवर पोलीस आणि पालिकेने नियंत्रण कक्ष उभारले असून तीनशे पोलीसांचा फोजफाटा तैनात करण्यात आला आहे.
पाच दिवसांच्या बाप्पाला निरोप ; मुंबई महापालिकेसह पोलीस प्रशासनाकडून खबरदारी

मुंबईत गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. घरगुती तसंच पाच दिवसांच्या गणपती आणि गौरींना आज भक्तांकडून निरोप दिला जातो. आज पाच दिवसांच्या गणपतीला निरोप देण्यासाठी चौपाट्या सज्ज झाल्या आहेत. तर प्रशासनाकडून देखील विसर्जनाची योग्य ती तयारी केली आहे. तसंच अनेक ठिकाणी कृत्रिम तलावांची निर्मिती देखील करण्यात आली आहे.

मुंबईतील चौपाट्या गणपती विसर्जनासाठी सज्ज झाल्या असून दादरस गिरगाव, जुहू चौपाटीवर सध्या विसर्जनाची लगबग सुरु झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रशासन देखील सज्ज झाल्याचं चित्र सध्या आहे. गणपती विसर्जनाला कोणत्याही प्रकारचं गालबोल लागू नये यासाठी मोठ्या प्रमाणावर फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तसंच प्रशासनाकडून चौपाट्यांवर आवश्यक त्या सोयी सुविधांची तरतूद देखील करण्यात आली आहे.

पाच दिवसांच्या गणपतीला निरोप देण्यासाठी दादर चौपाटी सज्ज झाली आहे. दादर आणि गिरगाव चौपाटीवर हजारो गणपतींचं विसर्जन करण्यात येतं. यावेळी गर्दीवर नियंत्रण रहावं यासाठी प्रशासनाकडून तयारी करण्यात आली आहे. चौपाट्यांवर पोलीस आणि पालिकेने नियंत्रण कक्ष उभारले असून तीनशे पोलीसांचा फोजफाटा तैनात करण्यात आला आहे. गणेश विसर्जनावर शंभर पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे.

भक्तांना गणेश मूर्ती विसर्जनासाठी समुद्रात जाण्याची परवानगी देण्यात येणार नाही. त्यासाठी शंभर स्वयंसेवक चौपाट्यांवर असणार आहेत. हे स्वयंमसेवर गणेश मूर्ती पाण्यात देऊन विसर्जन करतील. त्याच बरोबर मुंबई महापालिकेने प्रत्येक प्रभागात कृत्रिम तलावाची व्यवस्था केली आहे. नागरिकांना या कृत्रिम तलावात बाप्पांचं विसर्जन करण्याचं आवाहन महापालिकेकडून करण्यात आलं आहे. या कामात मुंबई महापालिकेच्या मदतीला स्वयंसेवी संस्था देखील मदत करणार आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in