लाडक्या बाप्पाला आज निरोप; विसर्जन स्थळी तराफे, ७८६ लाईफ गार्ड तैनात

मुंबई व परिसरात बुधवार सायंकाळपासून दमदार पाऊस पडत आहे. गुरुवारी सायंकाळी ही जोरदार सरी बरसल्या
लाडक्या बाप्पाला आज निरोप; विसर्जन स्थळी तराफे, ७८६ लाईफ गार्ड तैनात
Published on

हवामान विभागाने पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा दिला असून ‘यलो अलर्ट’ जारी केले आहे. त्यामुळे शुक्रवारी लाडक्या १० दिवसांचे बाप्पाच्या गणेश मुर्तींचे विसर्जन आहे. परंतु हवामान विभागाने दिलेल्या इशारा दिल्याने गणेश भक्तांनी विसर्जन स्थळी जाणे टाळावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. तसेच गणेश मुर्तींचे विसर्जन सुरळीत व सुरक्षित व्हावे यासाठी तराफे, ७८६ लाईफ गार्ड तैनात करण्यात आले आहेत. मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी मुंबई महापालिका सज्ज असल्याचे पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली

मुंबई व परिसरात बुधवार सायंकाळपासून दमदार पाऊस पडत आहे. गुरुवारी सायंकाळी ही जोरदार सरी बरसल्या. हवामान विभागाने दोन ते तीन दिवस ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहणार असून मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने मुंबई महापालिका प्रशासनाने बाप्पाच्या विसर्जनासाठी खबरदारी व काळजी घेतली आहे. ३१ ऑगस्ट रोजी लाडक्या बाप्पाच्या मुर्तीची प्रतिष्ठापना घराघरात व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात केले. उद्या शुक्रवार १० दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन करण्यात येत असून गणरायाला निरोप देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका विविध सेवा-सुविधांसह सुसज्ज आहे.

महानगरपालिका आयुक्त डॉ. इ. सिं. चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनात अनंत चतुर्दशीच्या अनुषंगाने विविध स्तरिय सेवा-सुविधांबाबत कार्यवाही करण्यात आली आहे. ७३ नैसर्गिक विसर्जनस्थळी करण्यात आलेली विविध स्तरिय सुव्यवस्था आणि १६२ ठिकाणी बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे उभारण्यात आलेले कृत्रिम विसर्जन स्थळांचा समावेश आहे.

logo
marathi.freepressjournal.in