गुडविन ज्वेलर्स घोटाळाप्रकरणी आरोपीची जामिनावर सुटका

कोट्यवधी रुपयांच्या गुडविन ज्वेलर्स घोटाळ्यातील आरोपी जस्टिन वर्गिसला उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला. न्यायमूर्ती एन. आर. बोरकर यांनी आरोपी जस्टिनची २५ हजारांच्या जातमुचलक्यावर सुटका केली.
गुडविन ज्वेलर्स घोटाळाप्रकरणी आरोपीची जामिनावर सुटका

मुंबई : कोट्यवधी रुपयांच्या गुडविन ज्वेलर्स घोटाळ्यातील आरोपी जस्टिन वर्गिसला उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला. न्यायमूर्ती एन. आर. बोरकर यांनी आरोपी जस्टिनची २५ हजारांच्या जातमुचलक्यावर सुटका केली.

गुडविन ज्वेलर्सने सोने आणि भिशी योजनेच्या नावाखाली राज्यभरातील हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. कोट्यवधींच्या या घोटाळ्यात गुडविनचे मालक ए. एम. सुधीरकुमार आणि ए. एम. सुनीलकुमार आणि गुडविन ज्वेलर्सच्या पुण्यातील बंडगार्डन शाखेचा व्यवस्थापक जस्टिन वर्गिससह एकूण सहा आरोपींपैकी तिघांना अटक केली होती.

कोरेगाव पार्क पोलिसांनी १२ ऑक्टोबर २०२२ रोजी जस्टिनला मुंबई विमानतळावरून अटक केली होती. १३ महिने तुरुंगात असलेल्या जस्टिनने ॲड. श्रीपाद हुशिंग यांच्यामार्फत हायकोर्टात जामिनासाठी अर्ज केला. त्यावर न्यायमूर्ती एन. आर. बोरकर यांच्यासमोर सुनावणी झाली. सरकारी पक्षाच्या म्हणण्यानुसार, गुंतवणूकदारांनी जस्टिनच्या बँक खात्यात थेट पैसे ट्रान्स्फर केले होते; मात्र यासंदर्भात आरोपपत्रात ठोस पुरावा नाही, असे निरीक्षण नोंदवत जस्टिनची जामिनावर सुटका केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in