गुगलचे जेमिनी माणसासारखा व्यवहार करणार नवीन कृत्रिम बुद्धिमत्ता सॉफ्टवेअर लॉंच

कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई म्हणाले की, गुगलमध्ये आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या नवीन युगाची सुरुवात झाली आहे. हे जेमिनी युग आहे.
गुगलचे जेमिनी माणसासारखा व्यवहार करणार
नवीन कृत्रिम बुद्धिमत्ता सॉफ्टवेअर लॉंच

सॅनफ्रास्किस्को : चॅट जीपीटी या कृत्रिम बुद्धिमत्तेला टक्कर देण्यासाठी जगातील मोठे सर्च इंजिन गुगलने आपले नवीन कृत्रिम बुद्धिमत्ता ‘जेमिनी’ लॉंच केले आहे. माणसासारखा व्यवहार करण्यास हे जेमिनी सक्षम असून त्याच पद्धतीने त्याचे डिझाईन बनवले आहे. समजणे, तर्क करणे, कोडिंग व नियोजन आदी कामे अन्य कृत्रिम बुद्धिमत्तेपेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने करेल, असा दावा गुगलने केला आहे.

कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई म्हणाले की, गुगलमध्ये आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या नवीन युगाची सुरुवात झाली आहे. हे जेमिनी युग आहे. जेमिनीचे प्रो, अल्ट्रा व नॅनो अशा तीन आवृत्ती आहेत. नॅनो आवृत्तीही ॲँड्राईड उपकरणासाठी आहे. जेमिनी प्रो ही उत्कृष्ट आवृत्ती आहे. जेमिनी ही अल्ट्रा गुगलपेक्षा अधिक शक्तिशाली आहे. ती डेटा सेंटर व इंटरप्राईजेस ॲॅप्लिकेशनसाठी बनवली आहे.

१७० देशात इंग्रजीत उपलब्ध

गुगलने सांगितले की, जेमिनीसोबत चॅटबोल्ट ‘बार्ड’ हा भारतासहित १७० देशांमध्ये इंग्रजीत उपलब्ध केला आहे. जेमिनीवर चालणाऱ्या बार्डसोबत तुम्ही गप्पा मारू शकता. गुगल लवकरच अन्य पद्धतीच्या (आवाज व व्हीडिओ) सहाय्यासाठी टूल तयार करेल. बार्ड गुगलने मे २०२३ मध्ये लँच केले होते. ही गुगलची विकसित कृत्रिम बुद्धिमत्ता आहे. त्याला तुम्ही कोणताही प्रश्न विचारू शकता. बार्ड त्याच्याकडील धोरणानुसार उत्तर देतो.

जेमिनी बहुउद्देशीय कामे करण्यात माहीर

जेमिनी ही कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेलवर आधारित आहे. जेमिनीचे अल्ट्रा मॉडेल हे तर्क करणे व छायाचित्रांना समजू शकते. या मॉडेलने चॅट जीपीटीपेक्षा चार पट अधिक कार्यक्षमपणे काम केले. हे मॉडेल मजकूर, ध्वनी, छायाचित्र व व्हीडिओसहित अनेक माहिती सहजपणे समजू शकतो.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in