Mumbai : गोरेगावात राडा; भाजप-मनसे कार्यकर्ते भिडले; एक जण जखमी

राज्यात महापालिका निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचला असून मुंबई पालिकेकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. त्यातच गोरेगाव पश्चिमेच्या प्रभाग क्रमांक ५८ मध्ये भाजप आणि मनसेच्या कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याची घटना घडली.
Mumbai : गोरेगावात राडा; भाजप-मनसे कार्यकर्ते भिडले; एक जण जखमी
Published on

मुंबई : राज्यात महापालिका निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचला असून मुंबई पालिकेकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. त्यातच गोरेगाव पश्चिमेच्या प्रभाग क्रमांक ५८ मध्ये भाजप आणि मनसेच्या कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याची घटना घडली. गोरेगाव पश्चिमेच्या अमृत नगर भागात प्रचाराचे टेबल लावण्यावरून भाजप आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याची माहिती आहे.

दरम्यान, दोन्ही गटांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. यावेळी झालेल्या हाणामारीत मनसेचा एक कार्यकर्ता जखमी झाल्याची माहिती आहे. तर घटनेची माहिती मिळताच गोरेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. तथापि, या राड्यामुळे गोरेगाव परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र ही घटना नेमकी कशामुळे घडली, त्यासोबतच दोन्ही बाजूचे किती जण जखमी आहेत, या संदर्भात गोरेगाव पोलीस तपास करत आहे. तर गुन्हा दाखल करून पुढील तपास केला जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in