कोरोनामुळे अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांची फी शासन भरणार -चंद्रकांत पाटील

विद्यार्थ्यांचे पदवी व पदव्युत्तरचे शिक्षण पूर्ण होईपर्यंतची संपूर्ण फी माफ करण्याबाबत सर्व अकृषी विद्यापीठांना निर्देश देण्यात आले
कोरोनामुळे अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांची फी शासन भरणार -चंद्रकांत पाटील
Published on

कोरोनामुळे दोन्ही पालकांचे निधन झालेल्या विद्यार्थ्यांचा सध्या सुरू असणाऱ्या मेडीकल, इंजिनिअरींग किंवा इतर कोणत्‍याही अभ्‍यासक्रमाची संपूर्ण फी तो अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत राज्य शासन भरेल. तो अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत सरकारच्या वतीने फी भरली जाईल, त्यासाठी कोणताही वेगळा निर्णय करण्याची आवश्यकता नाही, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत दिली.

कोरोनामुळे दोन्ही पालकांचे निधन झालेल्या विद्यार्थ्यांचे पदवी व पदव्युत्तर शिक्षण होईपर्यंतचे संपूर्ण शुल्क माफ करण्याच्या निर्णयाबद्दल शासनाने काय पावले उचलली, याबाबत रीष चौधरी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना पाटील बोलत होते. कोरोनामुळे दोन्ही पालकांचे निधन झालेल्या विद्यार्थ्यांचे पदवी व पदव्युत्तरचे शिक्षण पूर्ण होईपर्यंतची संपूर्ण फी माफ करण्याबाबत सर्व अकृषी विद्यापीठांना निर्देश देण्यात आले आहेत.

आतापर्यंत ९३१ पदवी अभ्यासक्रमातले विद्यार्थी, २०० पदवी अभ्यासक्रमातले विद्यार्थी आणि २२८ पदव्युत्तर अभ्यासक्रमातील विद्यार्थी यांना २ कोटी ७६ लाख ८४ हजार २२२ रक्कम वितरीत करण्यात आली आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली.

logo
marathi.freepressjournal.in