Mahaparinirvan Din : संविधानामुळे बदलले सामान्य जनतेचे आयुष्य; राज्यपालांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

६६व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (Mahaparinirvan Din) दादरच्या चैत्यभूमीवर असंख्य आंबेडकरी (Dr. Babasaheb Ambedkar) अनुयायांनी हजेरी लावली. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी केले संबोधित
Mahaparinirvan Din : संविधानामुळे बदलले सामान्य जनतेचे आयुष्य; राज्यपालांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (Mahaparinirvan Din) दादरच्या चैत्यभूमीवर असंख्य आंबेडकरी अनुयायांनी हजेरी लावली. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (BhagatSingh Koshyari) यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चैत्यभूमी येथे अभिवादन करण्यासाठी उपस्थित होते. यावेळी संबोधन करताना राज्यपाल भाषणात म्हणाले की, संविधानातून डॉ.आंबेडकर यांनी सामान्य माणसाला संजीवनी दिली. त्यामुळे सामान्य जनतेचे आयुष्य बदलले. असे म्हणत त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानासाठी दिलेल्या योगदानाचा उल्लेख केला.

६ मिनिटे झालेल्या भाषणामध्ये राज्यपाल भगतसिंग कोश्यारी म्हणाले की, "डॉ. बाबासाहेब आंबेकर यांचे कार्य मोठे आहे. त्यांच्याकडून जगण्याची प्रेरणा मिळते. सामान्य जनतेला मोठ्या पदावर जाण्याचा विश्वास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या योगदानामुळे मिळाला आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेल्या समता, बंधुता आणि न्यायाच्या मार्गावर आजवर आपण चालत आलो आहोत आणि चालत राहू." अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी देखील उपस्थित होते.

logo
marathi.freepressjournal.in