गोविदांचा उत्साह शिगेला; यंदाच्या दहिहंडी उत्सवात राजकीय थरार

मार्च २०२० मध्ये मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाला आणि त्यानंतर २०२१ पर्यंत प्रत्येक सण नियमांच्या चौकटीत राहून साजरे करावे लागले होते.
 गोविदांचा उत्साह शिगेला; यंदाच्या दहिहंडी उत्सवात राजकीय थरार

‘गोविंदा आला रे आला, मटकी संभाल ब्रीजबाला, हे गाणे कोरोनाच्या संकटामुळे गेली दोन वर्षे कानी पडले नव्हते. मात्र यंदा कोरोनाचे संकट ओसरले असून गल्लीबोळात दहिहंडी फोडण्याची शर्यत लागली आहे. शुक्रवारी मुंबईसह ठाण्यात ९ ते १० थराच्या लाखो रुपयांचे बक्षीस असलेल्या दहिहंडी लावण्यात येणार आहेत. या दहिहंडी फोडण्यासाठी गोविदांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.

दोन वर्षांनंतर मुंबईसह ठाण्यात मटकी फोडण्याचा गोविदांचा थरार अनुभवयास मिळणार आहे. दरम्यान, शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या वरळी येथील जांबोरी मैदानात भाजपने दहिहंडी लावण्याची घोषणा केल्याने शिवसेनेने सेनाभवनसमोर दहिहंडी लावण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे यंदाच्या दहिहंडी उत्सवात राजकीय थरार पाहायला मिळणार आहे.

मार्च २०२० मध्ये मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाला आणि त्यानंतर २०२१ पर्यंत प्रत्येक सण नियमांच्या चौकटीत राहून साजरे करावे लागले होते. मात्र चौथ्या लाटेवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याने सगळे निर्बंध हटवण्यात आले आहेत. त्यामुळे दहिहंडी उत्सव असो वा गणेशोत्सव, नवरात्रौत्सव प्रत्येक सण उत्साहात साजरा करता येणार आहे. कोरोनामुळे २०२०-२१ या वर्षांत दहिहंडी फोडण्याचा थरार अनुभवता आला नाही. मात्र यंदा दहिहंडी उत्सव जल्लोषात साजरा करता येणार आहे. दहिहंडी फोडण्यासाठी गेली वर्षभर गोविंदा सराव करण्यात यस्त होते. मात्र दोन वर्षांनंतर उद्या शुक्रवारी दहिहंडी फोडण्याचा थरार पहाता येणार आहे. मुंबईत १,५०० हुन अधिक दहिहंडी उत्सव मंडळ असून ९ ते १० थर फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये चुरस निर्माण झाली आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in