विदेश दौऱ्यासाठी कायमस्वरूपी सुट द्या ;अनिल देशमुख यांची हायकोर्टात धाव

न्यायालयाने परवानगी दिली असल्याने ती २ नोव्हेंबरपर्यंत कायम ठेवली
विदेश दौऱ्यासाठी कायमस्वरूपी सुट द्या ;अनिल देशमुख यांची हायकोर्टात धाव
Published on

मुंबई : कथित १०० कोटींच्या खंडणी प्रकरणात जामीनावर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना विदेशी दौऱ्यासाठी कायमस्वरूपी मुभा हवी आहे. त्यासाठी त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुंबई सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश राहुल रोकडे यांनी देशमुख यांना २ नोव्हेंबरपर्यंत जवळपास दोन महिने मुंबईबाहेर देशात कोठेही जाण्यास मुभा दिली आहे.

कथित १०० कोटींच्या खंडणी वसुली प्रकरणात अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर करताना मुंबईबाहेर जाण्यासाठी न्यायालयाची परवानगी घेणे बंधनकारक केले होते. यापूर्वी न्यायालयाने देशमुख यांना पहिल्यांदा मुंबईबाहेर संपूर्ण महाराष्ट्र आणि नवी दिल्लीत जाण्यास दीड महिन्यांची मुभा दिली. त्यानंतर ३१ ऑगस्ट पर्यंत संपूर्ण देशभरात जाण्यासाठी परवानगी दिली होती. ही मुदत संपल्याने देशमुख यांनी अ‍ॅड. इंद्रपाल सिंग यांच्यामार्फत नव्याने अर्ज दाखल दाखल करून मुदतवाढ मागितली होती. त्या अर्जावर सत्र न्यायाधी राहुल रोकडे यांच्यासमोर सुनावणी झाली. यापूर्वीही न्यायालयाने परवानगी दिली असल्याने ती २ नोव्हेंबरपर्यंत कायम ठेवली.

logo
marathi.freepressjournal.in