सर्वसामान्यांना सुखावणारी बातमी समोर आली आहे. म्हाडाकडून सर्व सामान्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. म्हाडाच्या घरांच्या किमती कमी केल्या जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता सर्वसामान्य लोकांना घर घेण्याच्या बाबतीत मोठा दिलासा मिळणार आहे. म्हाडा लॉटरीतील पडून असलेल्या घरांच्या किंमती कमी होणार असल्याची माहिती राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी दिली आहे. विक्री अभावी पडून असलेल्या घरांच्या किंमतींचा आढावा घेऊन निर्णय घेणार असल्याची माहिती मंत्री सावे यांनी दिली आहे.
राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी म्हाडाच्या लॉटरीतील पडून असलेल्या घरांच्या किंमती कमी होणार असल्याची घोषणा केली आहे. महत्वाचं म्हणजे म्हाडा लॉटरीतील पडून असलेल्या घरांच्या किंमती कमी होणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना फायदा होणार आहे. या घरांच्या किंमती कमी करुन पुनविक्री करणार अशल्याचं अतुल सावे यांनी सांगितलं आहे. यात सुमारे ११ हजार घरांचा समावेश आहे.
या घरांचं वीज बिल, पाणीपट्टी भरावी लागत असल्याने म्हाडाने याबाबतचा निर्णय घेतला असल्याचं अतुल सावे यांनी सांगितलं. या घरांचं वीज बिल, पाणीपट्टी यात म्हाडाचा बराच खर्च होतो. त्यामुळे अशा तब्बत ११ हजार घरांच्या किंमती कमी करुन पुन्हा विक्री करण्यात येणार आहे. नुकसान टाळत महसुल वाढीसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी सांगितलं.