गिरगाव चौपाटीवरील दर्शक गॅलरीला पर्यटकांचा उत्तम प्रतिसाद

शनिवार रविवार आणि पाऊस सुरू असताना ही गॅलरी हाऊस फुल होत आहे.
गिरगाव चौपाटीवरील दर्शक गॅलरीला पर्यटकांचा उत्तम प्रतिसाद

समुद्राची गाज, खळाळणाऱ्या लाटा, भणभणारा वारा... अशी सुरेल मैफल अनुभवण्यासाठी पर्यटकांसाठी गिरगाव चौपाटीवर पालिकेच्या डी विभागाकडून दर्शक गॅलरी साकारण्यात आली आहे. पावसाळ्यात ही गॅलरी हाऊस फुल होताना दिसत आहे. भरतीच्या वेळी उंच लाटाची धोका नसल्याने पर्यटकांच्या पसंतीस उतरत आहे. शनिवार रविवार आणि पाऊस सुरू असताना ही गॅलरी हाऊस फुल होत आहे.

गिरगाव चौपाटी, समुद्राचे सौंदर्यासोबत क्वीन नेकलेस पाहण्यासाठी गिरगाव चौपाटीलगत पालिकेच्या डी विभागाकडून १८०० चौ. मीटरची दर्शक गॅलरी तयार करण्यात आली आहे. अन्य वेळी ही गॅलरी पाहण्यासाठी गॅलरीत एकाच वेळी सुमारे ८०० पर्यटक उभे राहून समुद्रकिनारा पाहण्याचा आनंद घेत आहेत. तर येथे १५० नागरिकांना बसण्याची व्यवस्था केलेली आहे.

मुंबई आणि समुद्रकिनारे यांचा अतूट असा परस्पर स्नेहबंध आहे. शहरातील विविध समुद्रकिनाऱ्याकडे पर्यटकांची मोठ्या झुंबड असते. त्या पार्श्वभूमीवर चौपाटीवरील आगळावेगळा अनुभव या ठिकाणी पर्यटक घेत आहेत. पालिकेच्या डी विभागातर्फे कविवर्य भारा तांबे चौकाकडे भलीमोठी विस्तृत आकाराची गॅलरी उभारली गेली आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in