पूर्व-पश्चिम द्रूतगती महामार्गावर ग्रीन कॉरिडॉर; बांबूसह हजारो झाडांची चादर

मुंबईत हिरवळ निर्माण करण्यासाठी विविध प्रजातींची झाडांची लागवड करण्यात येत आहे.
पूर्व-पश्चिम द्रूतगती महामार्गावर ग्रीन कॉरिडॉर; बांबूसह हजारो झाडांची चादर

मुंबई : मुंबईत हिरवळ निर्माण करण्यासाठी विविध प्रजातींची झाडांची लागवड करण्यात येत आहे. आता पूर्व-पश्चिम द्रूतगती महामार्गावर ग्रीन कॉरिडॉर निर्माण करण्यात येणार असून यासाठी बांबूंच्या पाच लाख झाडांसह अन्य झाडांची लागवड करण्यात येणार आहे. यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात येत आहे. दरम्यान, बांबूच्या झाडांची लागवड कमी खर्चिक असून संशोधनात बांबू इतर झाडांच्या तुलनेत ३५ टक्के जास्त ऑक्सिजन सोडतो, असे पालिका आयुक्त डॉ. इक्बालसिंह चहल म्हणाले.

पहिल्या टप्प्यात पूर्व द्रूतगती महामार्गालगत भांडुप ते कन्नमवार नगरपर्यंत दोन्ही बाजूला सहा किलोमीटरवर बांबूची भिंत उभारली जाणार आहे. यासाठी तब्बल ८,१०० बांबूंचा वापर केला जाणार आहे. ही भिंत सहा फूट रुंदीची असेल. बांबू ही इंडोजेनियस आणि प्रथम वाढणारी प्रजाती आहे. मुंबईत विविध भागात बांबूंची लाखो झाडे लावण्यासाठी पालिकेचा उद्यान विभाग जागेचा शोध घेत आहे. बांबूच्या सुमारे १६०० जाती असून यासाठी शेतकरी नेते पाशा पटेल यांची मदत घेतली जाणार आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईत या प्रकल्पांतर्गत पाच लाख बांबूची झाडे लावण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in