मुंबईत हिरवळीची चादर ; संवेदनशील वॉर्डात ग्रीनिंग सोल्युशन्स; शाळेतून वृक्षारोपण उपक्रमाचा शुभारंभ

मुंबईतील संवेदनशील वॉर्डात 'ग्रीनिंग सोल्युशन्स' सुरु करण्यासाठी भागीदार संस्थांसोबत पालिकेने सुरू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग
File photo
File photo

पर्यावरणाचे संवर्धन काळाची गरज असून मुंबईत वृक्षारोपण करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे गरजेचे आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस आणि वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट इंडिया यांच्यासमवेत मुंबई महापालिकेने चेंबूर चिता कॅम्प येथील शहाजी नगर व‍िद्यालयात वृक्षारोपण उपक्रमाचे उद्घाटन केले. मुंबईतील संवेदनशील वॉर्डात 'ग्रीनिंग सोल्युशन्स' सुरु करण्यासाठी भागीदार संस्थांसोबत पालिकेने सुरू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग असलेला प्रभाग आहे.

शाळेच्या जागेवर हिरवे आच्छादन पुनरुज्जीवित करणे आणि वर्धित करणे, शालेय अभ्यासक्रमात जैवविविधता जागरूकता उपक्रम राबविणे, लागवड केलेल्या वनस्पतींचे संगोपन आणि देखभाल करण्यासाठी इको-क्लब चालवणे आणि एक लहान रोपवाटिका कार्यान्वित करणे यांचा समावेश आहे.

डब्ल्यूआरआय इंडिया, टीआयएसएस, उद्यान विभाग आणि बीएमसी येथील शिक्षण खात्याचे प्रतिनिधी तसेच शिक्षक, विद्यार्थी आणि इतर देखभाल करणाऱया कर्मचाऱ्यांसह उद्यान अधीक्षक आणि वृक्ष अधिकारी जितेंद्र परदेशी या उद्घाटनात सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे उद्दिष्ट शालेय कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या पाठिंब्याने हिरवळ वाढवणे आणि स्थानिक जैवविविधतेबद्दल जागरुकता निर्माण करणे या दोन्हींना प्रोत्साहन देणे आहे.

“शाळा ही वैज्ञानिक दृष्टीने हरितीकरण शिकण्यासाठी त्याचे संगोपनासाठी कार्यशाळा कशा असू शकतात याचे हे उत्तम उदाहरण आहे. शहराच्या शाळांमध्ये हिरवळ आणि जैवविविधता वाढवणारे, प्रत्येकजण निरोगी आणि सावलीच्या जागा निर्माण करणारे आणखी प्रकल्प राबवण्याचा मानस आहे, असे पालिकेचे उद्यान अधीक्षक व वृक्ष अधिकारी जितेंद्र परदेशी यांनी सांगितले.

उष्णता आणि पुराच्या जोखमीसाठी सर्वात असुरक्षित असलेल्या वॉर्डात हिरवळ वाढवण्याचा एक भाग आहे. दाट वस्ती असलेल्या भागात शाळा, मोकळ्या जागा, संस्थात्मक इमारती वनस्पती वाढवण्याची आणि सावली देण्याचे काम करतात.

-दीप्ती तळपदे ,उपक्रम संयोजक, डब्लूआरआय इंडिया

logo
marathi.freepressjournal.in