रचनात्मक चित्रांचे नेहरू सेंटर येथे सामूहिक चित्रप्रदर्शन

या प्रदर्शनात ॲक्रिलिक रंगसंगतीतून कॅनव्हासवर काढलेल्या विविधलक्षी चित्रांमध्ये मानवी आयुष्यातील अनेक पैलूंचे व रंगांचे तसेच त्याप्रकारच्या वास्तवाचे दर्शन
रचनात्मक चित्रांचे नेहरू सेंटर येथे सामूहिक चित्रप्रदर्शन

विविध विषय, रंगसंगती रेखाटणारे सामूहिक चित्रप्रदर्शन मुंबईतील नेहरू सेंटर येथे आयोजित करण्यात आले आहे. २० ते २६ सप्टेंबर या दरम्यान हे प्रदर्शन भरणार आहे. रोज सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत कला रसिकांना हे प्रदर्शन विनामूल्य बघता येणार आहे. कलाकार आसिफ शेख, दीपक पाटील, राम कुंभार आणि योगेश लोखंडे ह्यांनी सामूहिकरीत्या प्रदर्शन मांडले आहे.

या प्रदर्शनात ॲक्रिलिक रंगसंगतीतून कॅनव्हासवर काढलेल्या विविधलक्षी चित्रांमध्ये मानवी आयुष्यातील अनेक पैलूंचे व रंगांचे तसेच त्याप्रकारच्या वास्तवाचे दर्शन होते. याशिवाय निसर्गचित्रे, व रचनात्मक कलाकृतींचे आकर्षक दर्शन होते. मिश्र माध्यमे व जलरंग याचा वापर करण्यात आला असून भावपूर्ण चेहरा व मनातील नेमके भाव चेहऱ्यावर दर्शविणे तसेच त्या भागातील स्त्री व पुरुषांनी तसेच मुलांनी परिधान केलेली वस्त्रप्रावरणे, आभूषणे व तेथील रूढी/परंपरा व संस्कृती दर्शविणारी विविध प्रतीकात्मक चिन्हे प्रदर्शनातून मांडण्यात आली आहेत. सोबत फायबर ग्लास ह्या माध्यमात तयार केलेल्या विविध कलाकृती खरोखर अवर्णनीय व अनोख्या आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in