गुरुनानक महाविद्यालय आणि रोट्रॅक क्लब ऑफ जी. एन.सी यांच्या संयुक्त विद्यमानाने बीएएमसी विभागाचा "रंग" सोहळा उत्साहात पार

सक्षम, रुक्मिणी, कलयुग, बेगुनाह, अपरिचित अशा विविध संकल्पना घेऊन विद्यार्थ्यांनी नाट्य बसवले होते.
गुरुनानक महाविद्यालय आणि रोट्रॅक क्लब ऑफ जी. एन.सी यांच्या संयुक्त विद्यमानाने बीएएमसी विभागाचा "रंग" सोहळा उत्साहात पार

मीडिया क्षेत्रात जोपर्यंत तुम्ही एखादी गोष्ट प्रात्यक्षिक रित्या करून पाहत नाही तोपर्यंत ती तुम्हाला नीट समजत नाही म्हणूनच सायन येथील गुरू नानक महाविद्यालयातील बीएएमसी विभाग विद्यार्थ्यांना विषयाला धरून प्रात्यक्षिक रित्या अभ्यास करण्यासाठी नेहमीच प्रोत्साहित करतो. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आणि येऊ घातलेल्या थिएटर डे च्या निमित्ताने थिएटर अँड मास कम्युनिकेशन या विषयाला धरून "महिला" या शीर्षकांतर्गत विविध नाट्य विद्यार्थ्यांनी बसवले होते.

सक्षम, रुक्मिणी, कलयुग, बेगुनाह, अपरिचित अशा विविध संकल्पना घेऊन विद्यार्थ्यांनी नाट्य बसवले होते. या नाट्यांचे सादरीकरण नुकतेच गुरुनानक महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये ३०० हून अधिक प्रेक्षकांसमोर "रंग" नाट्यसोहळा या नावाने उत्साहात पार पडले. या नाट्यसोहळ्याचे उद्घाटन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पुष्पिंदर भाटिया, उपप्राचार्य डॉ.रामचंद्रन नाडार तसेच रोट्रॅक क्लब ऑफ जी. एन.सी च्या नंदा कुलकर्णी, डॉ.माया वानखडे, एन. के. कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. बीएएमसी विभागाच्या प्रमुख प्रा.अमरीन मोगर यांच्या मार्गदर्शनाखाली रंग सोहळ्याच्या समन्वयिका प्रा.संपदा सावंत यांनी विद्यार्थ्यांकडून सराव करून घेतला. विद्यार्थ्यांना नाटकातील बारकावे सांगण्यासाठी प्रा.डॉ. दीपक सूर्यवंशी यांचे देखील मोलाचे सहकार्य लाभले. रंग नाट्य सोहळ्यासाठी तामिळ फिल्म इंडस्ट्रीच्या सुप्रसिद्ध अभिनेत्री तिरथा मुरबाडकर या देखील उपस्थित होत्या.

"विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळावे यासाठी बीएएमसी विभाग नेहमीच प्रयत्नशील असतो, विद्यार्थी घडवण्यासाठी बीएएमसी विभाग ज्या कार्यकृती करत आहे त्या खरच खूप स्तुत्य आहेत" असे प्रतिपादन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पुष्पिंदर भाटिया यांनी केले. पात्र-उपपात्र, कथानक, संकल्पना, भाषा, संवाद, विविध देखावे, प्रसंग, वेळ, गोष्ट, नेपथ्य, वेशभूषा रंगभूषा, केशभूषा, छायाचित्रकार या सर्व घटकांचा ताळमेळ साधून रंग सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in