राज्यभरात गुढीपाडव्यानिमित्त तरुणाईचा जल्लोष; शोभायात्रेत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचा सहभाग

आज गुढीपाडव्यानिमित्त राज्यात अनेक ठिकाणी शोभायात्रा काढण्यात आल्या, यावेळी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनी सहभाग घेतला
राज्यभरात गुढीपाडव्यानिमित्त तरुणाईचा जल्लोष; शोभायात्रेत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचा सहभाग
Published on

गुढीपाडवा म्हंटल की दरवर्षी आकर्षण असते ते राज्यामध्ये निघणाऱ्या शोभायात्रेचं. आज मराठी नवीन वर्षाचे स्वागत करताना अनेक ठिकाणी शोभायात्रा काढण्यात आल्या. यावेळी लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत अनेक जणांनी आपल्या पारंपरिक वेशात मराठी नववर्षाचे स्वागत केले.

अंधेरीच्या मरोळ परिसरामध्ये ढोल ताशांच्या गजरात निघाली शोभायात्रा

मुंबईच्या गिरगावमध्ये मोठ्या उत्साहात गुढीपाडवा साजरा केला गेला.

मुंबईकरांनी मोठ्या संख्येने या शोभायात्रेला हजेरी लावली. गिरगावच्या फडके गणेश मंदिरापासून शोभायात्रेला सुरुवात झाली तर गोरेगावमध्ये २२ फुटांची गुढी उभारण्यात आली.

logo
marathi.freepressjournal.in