गुरुनानक महाविद्यालयात 'कलाउत्सव'ची धूम

सायन येथील गुरु नानक कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या परफॉर्मिंग आर्ट्स सर्कलच्या माध्यमातून नुकतेच 'कलाउत्सव'चे आयोजन करण्यात आले होते.
गुरुनानक महाविद्यालयात 'कलाउत्सव'ची धूम

सायन येथील गुरु नानक कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या परफॉर्मिंग आर्ट्स सर्कलच्या माध्यमातून नुकतेच 'कलाउत्सव'चे आयोजन करण्यात आले होते. 'कलाउत्सव' म्हणजे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना त्यांच्या अंगात दडलेल्या सुप्त गुणांना दाखवण्यासाठी मिळालेले एक उत्तम व्यासपीठ. यंदाच्या कलाउत्सवात परीक्षक म्हणून सुप्रसिद्ध अभिनेता अनुज ठाकरे आणि सुप्रसिद्ध गायक चित्रांषु श्रीवास्तव लाभले होते. १२ सूत्रसंचालक, २२ परफॉर्मन्सेस,१०० पेक्षा जास्त विद्यार्थी स्पर्धेत सहभागी झाले होते. ६ जणांची परफॉर्मिंग आर्ट सर्कल टीमने मिळून हा उत्सव यशस्वीरित्या पार पडला.

कलाउत्सव - २०२३ सोलो डान्स प्रथम पारितोषिक विशाल गुप्ता, द्वितीय पारितोषिक पूजा साहू, तर उत्तेजनार्थ पारितोषिक सार्थक त्रिभुवन यांना प्राप्त झाला. तसेच सोलो सिंगिंग मध्ये प्रथम पारितोषिक अद्वेध कोरपे, द्वितीय पारितोषिक श्रावणी तांबे, उत्तेजनार्थ पारितोषिक रोहित गुप्ता यांना प्राप्त झाला. तसेच ग्रुप डान्स प्रथम पारितोषिक मनदीप आणि ग्रुप (भांगडा नृत्य), द्वितीय पारितोषिक सानिका आणि ग्रुप (आदिवासी नृत्य), उत्तेजनार्थ पारितोषिक कल्पना आणि ग्रुप (राजस्थानी नृत्य) यांना प्राप्त झाला. फॅशन शो मध्ये प्रथम पारितोषिक सानिका आणि ग्रुप (थीम: LGBTQ), द्वितीय पारितोषिक ज्योती आणि ग्रुप (थीम: जोकर), उत्तेजनार्थ पारितोषिक प्रेमलता आणि समूह (थीम: हॉरर) यांना प्राप्त झाला. पी.ए.सीने यशस्वीरित्या पार पडलेल्या कलाउत्सवचे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.पुष्पिंदर भाटिया यांनी कौतुक केले.

logo
marathi.freepressjournal.in