हार्बरची सेवा विस्कळीत

पॉईंट फेल झाल्याचे कळताच रेल्वे अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली
हार्बरची सेवा विस्कळीत

मुंबई : वडाळा रेल्वे स्थानक येथे पॉइंट फेल झाल्याने हार्बर मार्गावरील सेवा विस्कळीत झाली. या मार्गावरील लोकल १५ मिनीटे विलंबाने धावत होत्या. ऐन गर्दीच्या वेळी हा प्रकार घडल्याने हार्बरवरील प्रत्येक स्थानकावर गर्दी वाढत होती.

वडाळा रेल्वे स्थानकावर सायंकाळी ७.४१ वाजता पॉईंट फेल्युअर झाला. हे काम ७.५६ वाजता तत्काळ दुरुस्त करण्यात आले. सायंकाळी विलंब झाल्याने सीएसएमटी, मशीद, सँहडर्स्ट रोड, वडाळा आदी रेल्वे स्थानकावर गर्दी जमा झाली होती.

रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, पॉईंट फेल झाल्याचे कळताच रेल्वे अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

logo
marathi.freepressjournal.in