काँक्रिटच्या रस्त्यालाच पडले तडे आरे कॉलनीत खडतर प्रवास

मुंबई खड्डे मुक्त करण्यासाठी सिमेंट काँक्रिटचे रस्ते करा, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिकेला दिले.
काँक्रिटच्या रस्त्यालाच पडले तडे आरे कॉलनीत खडतर प्रवास

मुंबई : मुंबई खड्डेमुक्त करण्यासाठी सिमेंट काँक्रिटचे रस्ते करण्यावर भर दिला जात आहे. पश्चिम उपनगरात सिमेंट काँक्रिटचे रस्ते करण्यास ही सुरुवात झाली. मात्र आरे कॉलनीत सिमेंट काँक्रिटच्या रस्त्याला तडे गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे राज्य सरकार व मुंबई महापालिकेने खड्डेमुक्त रस्ते हा दावा फोल ठरल्याचा आरोप करत स्थानिक रहिवासी व प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.

मुंबई खड्डे मुक्त करण्यासाठी सिमेंट काँक्रिटचे रस्ते करा, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिकेला दिले. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर तातडीने निविदा प्रक्रिया राबवत ६ हजार कोटींचे सिमेंट काँक्रिटचे रस्ते करण्याचे कंत्राट देण्यात आले. मात्र मुंबई शहरातील सिमेंट काँक्रिटच्या रस्तेकामाला अद्याप सुरुवात न झाल्याने नव्याने निविदा प्रक्रिया राबवण्यात आली आहे. मात्र पूर्व व पश्चिम उपनगरात सिमेंट काँक्रिटची रस्ते कामे सुरू असून आरे कॉलनीत सिमेंट काँक्रिटचे रस्ते तयार करण्यात आले.

सिमेंट काँक्रिटच्या रस्तेकामात घोटाळा झाल्याने रस्त्यांची दूरवस्था झाली आहे, असा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) स्थानिक शाखाप्रमुख संदीप गाढवे यांनी उपस्थित केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in