एचडीएफसी दोन कोटी पेक्षा कमी रकमेच्या एफडींवरील व्याजदरांत वाढ करणार

एचडीएफसी दोन कोटी पेक्षा कमी रकमेच्या एफडींवरील व्याजदरांत वाढ करणार
Published on

खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बॅंकेने दोन कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या एफडींवरील व्याजदरांत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. एचडीएफसी बॅंकेने हा निर्णय बुधवारी (१८ मे जाहीर झाला असून तो तत्काळ लागू झाला आहे.

बॅंक ७ ते २९ दिवासांच्या फिक्स्ड डिपॉझिटवर २.५० टक्के व्याज देणार आहे. ३० ते ९० दिवसांमध्ये मॅच्युअर होणाऱ्या एफडीवरील ३ टक्के व्याजदर कायम असेल. सर्वसामान्य लोकांना ९१ दिवसांपासून ते ६ महिन्यांपर्यंत मॅच्युअर होणाऱ्या एफडींवर ३.५० टक्के व्याजदर मिळेल. ६ महिने १ दिवसापासून ते ९ महिन्यांच्या कालावधीत मॅच्युअर होणाऱ्या एफडीवर ४.४० टक्के व्याज मिळेल. एचडीएफसी बॅंक ९ महिने १ दिवस आणि १ वर्षापेक्षा कमी कालावधीत मॅच्युअर होणाऱ्या एफडीवर ४.४० टक्के व्याज देत आहे. त्यात १० बेसिस पॉईंट्सची वाढ करण्यात आली आहे. आता या कालावधीतील व्याजदरात ४.५० टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in