आइस्क्रीम देण्यास नकार दिला म्हणून चाकूने भोसकले

तक्रारीवरून पोलिसांनी आवेशविरुद्ध गुन्हा नोंदविला होता. याप्रकरणी वसीमच्या तक्रारीवरून पोलिसांनी आवेशविरुद्ध गुन्हा नोंदविला होता
आइस्क्रीम देण्यास नकार दिला म्हणून चाकूने भोसकले

मुंबई : आइस्क्रीम देण्यास नकार दिला म्हणून वसीम अक्रम अब्दुल करीम खान या २९ वर्षांच्या व्यक्तीवर त्याच्याच परिचित आरोपीने चाकूने वार केल्याची घटना अंधेरी परिसरात घडली. हल्ल्यात जखमी झालेल्या वसीमवर कूपर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी आवेश मकरानी ऊर्फ नाका या आरोपीविरुद्ध डी. एन नगर पोलिसांनी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा नोंदविला आहे. वसीम हा त्याच्या पत्नी आणि दोन मुलांसोबत अंधेरी परिसरात राहतो. शनिवारी रात्री अकरा वाजता तो त्याच्या मुलांना आइस्क्रीम देण्यासाठी दुकानात जात होता. यावेळी तिथे त्याचा परिचित आवेश आला. त्याने त्याच्यासाठी आइस्क्रीमची मागणी केली; मात्र त्याने पैसे नसल्याने त्याला आइस्क्रीम देण्यास नकार दिला होता. त्यातून त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली आणि त्याने शिवीगाळ करून वसीमवर चाकूने वार केले. पोटावर, पाठीवर आणि छातीवर वार झाल्याने वसीम हा गंभीररीत्या जखमी झाला होता. त्यामुळे त्याला स्थानिक रहिवाशांनी तातडीने कूपर रुग्णालयात दाखल केले. ही माहिती मिळताच डी. एन. नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी वसीमच्या तक्रारीवरून पोलिसांनी आवेशविरुद्ध गुन्हा नोंदविला होता. याप्रकरणी वसीमच्या तक्रारीवरून पोलिसांनी आवेशविरुद्ध गुन्हा नोंदविला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in