अंधेरी तहसिल कार्यालयात आरोग्य शिबीर संपन्न

योजनेंतर्गत होणाऱ्या शस्त्रक्रियांची माहिती देण्यात आली
अंधेरी तहसिल कार्यालयात आरोग्य शिबीर संपन्न

मुंबई : महसूल सप्ताहानिमित्त महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग, जिल्हाधिकारी मुंबई उपनगर जिल्हा अंतर्गत तहसिल अंधेरी येथे सोमवारी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रुग्णमित्र व स्पेशल ह्युमिनिटी केअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच अंधेरीच्या स्नेहलता स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या शिबिराला माजी पोलीस अधिकारी सुनिता नाशिककर यांची उपस्थिती होती. तहसिलदार कार्यालयातील कर्मचारी व कार्यालयात येणाऱ्या व्यक्तींची नेत्र तपासणी, दमा, बीएमआय चाचणी करण्यात आली. तसेच योजनेंतर्गत होणाऱ्या शस्त्रक्रियांची माहिती देण्यात आली. अशा प्रकारे आगळ्यावेगळ्या पद्धतीने आरोग्य शिबिराच्या माध्यमातून अंधेरी तहसिल कार्यालयाने महसूल सप्ताह साजरा केला.

logo
marathi.freepressjournal.in