मुंबई मनपा रुग्णालयात आरोग्य व्यवस्थापन यंत्रणा बसवणार

मुंबई मनपाच्या रुग्णालयात रोज ५४ हजार रुग्णांवर उपचार केले जातात. सध्या बा. य. ल. नायर रुग्णालयात आरोग्य व्यवस्थापन माहिती यंत्रणा तयार केली जाईल.
मुंबई मनपा रुग्णालयात आरोग्य व्यवस्थापन यंत्रणा बसवणार

स्वप्नील मिश्रा/मुंबई : मुंबई शहरातील पालिकेच्या सर्व रुग्णालयांत आरोग्य व्यवस्थापन माहिती यंत्रणा तयार केली जाणार आहे. रुग्णालयांमध्ये रोगाच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवण्यासाठी आणि रोगाचे निरीक्षण करण्यासाठी ही यंत्रणा सुरू केली जाईल. यासाठीच्या निविदा मनपाने यापूर्वीच काढल्या आहेत.

वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आजारांची माहिती मिळण्यासाठी एकमेव व्यासपीठ तयार केले जाणार आहे. त्यातून संसर्गजन्य आजारांची माहिती मिळण्यास मदत मिळणार आहे. राष्ट्रीय लसीकरण मोहिमेवर लक्ष ठेवण्यास त्यातून मदत मिळणार आहे.

मुंबई मनपाच्या रुग्णालयात रोज ५४ हजार रुग्णांवर उपचार केले जातात. सध्या बा. य. ल. नायर रुग्णालयात आरोग्य व्यवस्थापन माहिती यंत्रणा तयार केली जाईल. त्यातून आरोग्यविषयक सर्व नोंदी डिजिटलाईज्ड केल्या जातील. त्याचबरोबर औषधांचा साठा रुग्णालयात किती आहे, याची माहिती मिळणार आहे.

मुंबई मनपाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे म्हणाले की, रुग्णालयातील सर्व रेकॉर्डचे डिजिटलायझेशन होणार आहे. त्याचा फायदा रुग्णांना होईल. त्यामुळे रुग्णांना त्यांचा वैद्यकीय इतिहास सहजपणे मिळू शकेल. त्यांच्या चाचण्यांचा रिपोर्टही डिजिटल स्वरूपात साठवला जाईल, असे ते म्हणाले.

मुंबई मनपाची चार वैद्यकीय महाविद्यालये, एक दंत महाविद्यालय, १६ उपनगरीय रुग्णालय, पाच विशेष रुग्णालये, ३० प्रसूती रुग्णालय व १९२ दवाखाने आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in