मराठा सर्वेक्षणात आरोग्य सेविकेला मारहाण, त्वरित अटक करण्याची मागणी

२३ जानेवारीपासून मुंबईत मराठा सर्वेक्षणाला सुरुवात झाली असून सर्वेक्षण करणाऱ्या पालिका कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
मराठा सर्वेक्षणात आरोग्य सेविकेला मारहाण, त्वरित अटक करण्याची मागणी
Published on

मुंबई : २३ जानेवारीपासून मुंबईत मराठा सर्वेक्षणाला सुरुवात झाली असून सर्वेक्षण करणाऱ्या पालिका कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यात वांद्रे येथे मराठा सर्वेक्षणात आरोग्य सेविकेला मारहाण झाल्याचे आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेकडून सांगण्यात आले. दरम्यान, या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले. दरम्यान, मारहाण करणाऱ्यांना त्वरित अटक करण्यात यावी, अशी मागणी आरोग्यसेवा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष ॲड. प्रकाश देवदास यांनी केली आहे.

मराठा सर्वेक्षणासाठी पालिकेच्या विविध विभागांतील ३० हजार कर्मचाऱ्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मात्र या सर्वेक्षणात सार्वजनिक आरोग्य खात्याकडून जबरदस्ती केली जाते. सर्वेक्षणावेळी डॉक्टर्स व महिला आरोग्यसेविका वर नागरिकांकडून हल्ले होत असून, अपमान केला जात आहे. पालिका प्रशासन महिला डॉक्टर्स, महिला आरोग्य सेविकांना संरक्षण देवू शकत नसेल, तर सर्वेक्षण बंद करावे व ज्यांनी मारहाण केली, त्यांना त्वरित अटक करण्यात यावी, अशी मागणी केल्याचे ॲड. प्रकाश देवदास म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in