संजय राऊत यांच्या जामीन अर्जाची सुनावणी २७ सप्टेंबरपर्यंत लांबणीवर

१५ दिवसांपूर्वी ८ सप्टेंबरला राऊत यांनी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) तपास सुरू ठेवू शकते
संजय राऊत यांच्या जामीन अर्जाची सुनावणी २७ सप्टेंबरपर्यंत लांबणीवर

पत्राचाळ घोटाळ्याचे मास्टरमाइंड आणि सर्वात मोठे लाभार्थी असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या शिवसेना नेते सजय राऊत यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर पडली आहे. मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए न्यायालयाचे न्यायाधिश एम. जी. देशपांडे अन्य न्यायालयीन कामकाजामध्ये व्यस्त असल्याने अर्जाची सुनावणी २७ सप्टेंबरला निश्‍चित केली आहे.

१५ दिवसांपूर्वी ८ सप्टेंबरला राऊत यांनी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) तपास सुरू ठेवू शकते, परंतु आपल्याला तुरुंगात ठेवल्याने काहीही निष्पन्न होणार नाही, असा दावा करत विशेष न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर ताडीने सुनावणी घेण्याचे मागणी केली होती; मात्र न्यायालयाच्या व्यस्त कार्यामुळे जामीन अर्जावर तातडीने घेता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

न्यायालय म्हणते...

ईडीने जामीन अर्जाला विरोध करताना राऊत यांच्या विरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल केले. राऊत यांनी नव्याने जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. त्या अर्जावर न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांच्यासमोर बुधवारी सुनावणी झाली; परंतु न्यायालय अन्य न्यायालयीन कामकाजामध्ये व्यस्त असल्याने अर्जाची सुनावणी २७ सप्टेंबरला निश्ि‍चत केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in