खार येथे भररस्त्यात गोळीबार;परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण

रात्री उशिरा तीन अज्ञात व्यक्तीविरुद्ध खार पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे
खार येथे भररस्त्यात गोळीबार;परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण

खार येथे भररस्त्यात झालेल्या गोळीबाराच्या घटनेने परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनास्थळी पोलिसांना एक पत्र सापडले असून या पत्रात गोळीबार करणार्‍या अज्ञात व्यक्तींनी रस्त्यावरील फेरीवाल्यांना धमकीवजा इशारा दिला आहे. त्यांनी रस्त्यावर व्यवसाय करु नये अन्यथा परिणाम वाईट होतील, अशी धमकीच फेरीवाल्यांना देण्यात आली आहे. याप्रकरणी रात्री उशिरा तीन अज्ञात व्यक्तीविरुद्ध खार पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे. या गुन्ह्यांचा संमातर तपास गुन्हे शाखेचे अधिकारी करीत आहेत.

ही घटना गुरुवारी सायंकाळी खार येथील लिकिंग रोडवरील गेजिबो शॉपिंग सेंटरजवळ घडली. हा परिसर नेहमीच गजबजलेला परिसर म्हणून ओळखला जातो. गुरुवारी सायंकाळी सव्वासात वाजता एका बाईकवरुन तीन तरुण आले आणि काही कळण्यापूर्वीच त्यांनी हवेत तीन गोळ्या झाडल्या. अचानक झालेल्या गोळीबाराने तिथे उपस्थित लोकांसह फेरीवाल्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. एक पत्र टाकून ते तिघेही बाईकवरुन पळून गेले होते. गोळीबाराची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकार्‍यांसह खार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. ते पत्र पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यात खार येथील लिकिंग रोडवरील फेरीवाल्यांना धमकीवजा इशारा देण्यात आला होता.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in