Rain Alert ; पुढील २४ तास मुसळधार पावसाचा अंदाज - हवामानतज्ज्ञ

मंगळवारी सकाळपासून पावसाचा जोर कायम आहे. गेल्या काही तासांपासून पावसाचा जोर वाढला आहे. मुंबईत मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचू लागले
File Photo
File PhotoANI

संपूर्ण राज्यात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. मुंबई, पुणे, सातारा आणि कोकणात मुसळधार पाऊस पडत आहे. आता मुंबईत पुढील तीन तास मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, सातारा पुणे आणि कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सोमवारपासून राज्यात पावसाने हजेरी लावल्यानंतर मंगळवारी सकाळपासून पावसाचा जोर कायम आहे. गेल्या काही तासांपासून पावसाचा जोर वाढला आहे. मुंबईत मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचू लागले आहे.

हवामान तज्ज्ञ डॉ.कृष्णानंद होसाळीकर यांनी पुढील २४ तास मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मुंबई, सातारा, पुण्यासह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे होसाळीकर यांनी म्हटले आहे. त्यांनी ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in