मुंबईत आज मुसळधार पावसाचा इशारा

कुलाब्यात ८४.०८ मिमी, तर सांताक्रुझला ९९.०१ मिमी पावसाची नोंद झाली
मुंबईत आज मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई : बुधवारी धुमाकूळ घालणारा पाऊस गुरुवारी अत्यंत शांतपणे बरसत होता. दुपारपासून पावसाची तीव्रता कमी झाली. दरम्यान, येत्या २४ तासांत मुंबईत अतिवृष्टीचा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

गुरुवारी उपनगरी रेल्वे गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या. अनेक प्रवासी ट्रेन पकडण्यासाठी घाई करताना स्टेशनवर दिसत होते.

कुलाब्यात ८४.०८ मिमी, तर सांताक्रुझला ९९.०१ मिमी पावसाची नोंद झाली.

येत्या २४ तासांत मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. मुंबईत ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहतील. मुंबईला ऑरेंज ॲॅलर्ट व पालघर, ठाणे व रायगडला रेड ॲॅलर्ट दिला आहे.

शहरात दिवसभरात झाडांच्या फांद्या पडण्याच्या २५ घटना घडल्या. भिंती पडण्याच्या २, तर शॉर्टसर्किटच्या ८ घटना घडल्या.

logo
marathi.freepressjournal.in