‘तो’ पुन्हा परतला! मुंबई, ठाणे, पालघरमध्ये जोरदार पर्जन्यवृष्टी

मुंबई, ठाणे, पालघरमध्ये जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. तसेच हवामान विभागाने राज्यात पुढील तीन-चार दिवस मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे
‘तो’ पुन्हा परतला! मुंबई, ठाणे, पालघरमध्ये जोरदार पर्जन्यवृष्टी
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : गेले दोन आठवडे गायब झालेला पाऊस मंगळवारपासून पुन्हा परतला आहे. त्यामुळे दोन आठवडे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. मुंबई, ठाणे, पालघरमध्ये जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. तसेच हवामान विभागाने राज्यात पुढील तीन-चार दिवस मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.

मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. तसेच राज्यात पुढील तीन दिवस सर्वत्र पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकणात वादळी वाऱ्यांसह सर्वत्र हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईतही पुढील दोन दिवस मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

मुंबईत मंगळवारी सकाळपासून अनेक भागात अधूनमधून जोरदार सरी कोसळल्या. तसेच सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातही विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

विदर्भात विजेच्या कडकडाटासह पाऊस

मराठवाड्यात ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहतील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मराठवाड्यात अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो, असा अंदाज आहे. त्यासोबतच विदर्भात सर्वत्र विजेच्या कडकडाटासह पावसाचा इशारा वर्तवण्यात आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in