मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाची दमदार हजेरी

राज्यातील अनेक जिल्ह्यांत ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली
मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाची दमदार हजेरी

मुंबईत वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे. विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत आहे. मुंबईसह ठाणे, पालघरमध्येही मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. संध्याकाळी कामावरून घरी जाण्याची वेळ असल्याने चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.

येत्या दोन दिवसांत राज्यातील अनेक जिल्ह्यांत ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच गुरुवारपासून पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. मुंबईत आज सकाळपासून पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र दुपारी चारनंतर अचानक ढग दाटून आले आणि पावसाला सुरुवात झाली. मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवलीतही मुसळधार पाऊस पडत आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in