अँकर ग्रुपच्या संचालकाची अटक 'बेकायदेशीर'; सुटका करण्याचे न्यायालयाचे मुंबई पोलिसांना आदेश

फसवणूक प्रकरणात अँकर ग्रुपचे संचालक हेमांग शाह यांची केलेली अटक पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचा निर्वाळा देत उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना मोठा झटका दिला. शाह यांना आर्थिक गुन्हे शाखेने (ईओडब्ल्यू) १७ मे रोजी अटक केली होती.
Mumbai High Court
Mumbai High Court
Published on

मुंबई : फसवणूक प्रकरणात अँकर ग्रुपचे संचालक हेमांग शाह यांची केलेली अटक पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचा निर्वाळा देत उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना मोठा झटका दिला. शाह यांना आर्थिक गुन्हे शाखेने (ईओडब्ल्यू) १७ मे रोजी अटक केली होती. त्यांना आर्थर रोड मध्यवर्ती कारागृहातून तात्काळ सोडण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.

अँकर इलेक्ट्रिकल्स कंपनीच्या विक्रीच्या प्रक्रियेत मोठ्या भावाची ९ कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी हेमांग शाह यांना अटक केली होती. वास्तविक कंपनीची २००७ मध्ये पॅनासोनिक इलेक्ट्रिकल्सला विक्री करण्यात आली होती. या प्रकरणात अटकेची कारवाई करून जवळपास ३० तास उलटल्यानंतर याचिकाकर्त्या हेमांग शाह यांना दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले होते.

हा विलंब कायदेशीर तत्त्वांच्या विरुद्ध असून अशा विलंबामुळे आरोपीच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होते. त्याचबरोबर ईओडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांनी एफआयआर नोंदवण्यात प्रचंड घाई केली आहे, असे निरिक्षण न्यायमूर्ती गौरी गोडसे आणि न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरेसन यांच्या सुट्टीकालीन खंडपीठाने नोंदवले.

logo
marathi.freepressjournal.in