हेरिटेज टूरला प्रवाशांची बेस्ट पसंती ; तीन महिन्यांत २५ हजार प्रवाशांची टूर; लाखोंचा महसूल जमा

सध्या बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात १२ वातानुकूलित इलेक्ट्रीक डबलडेकर बसेस असून ,त्यापैकी चार बसेस हेरिटेज टूर सेवा म्हणून प्रवाशांच्या सेवेत
हेरिटेज टूरला प्रवाशांची बेस्ट पसंती ; तीन महिन्यांत २५ हजार प्रवाशांची टूर; लाखोंचा महसूल जमा

प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या बेस्ट उपक्रमाने प्रवाशांच्या सेवेत हेरिटेज टूर बससेवा फेब्रुवारी अखेरीस उपलब्ध केली. अवघ्या तीन महिन्यांत तब्बल २५ हजार ८३७ प्रवाशांनी हेरिटेज टूरचा आनंद लुटला. विशेष म्हणजे, हेरिटेज टूर बसेस मध्ये चार वातानुकूलित इलेक्ट्रीक डबलडेकर व तीन ओपन डेक प्रवाशांच्या पसंतीस उतरत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. प्रवाशांचा वाढता प्रतिसाद यामुळे बेस्ट उपक्रमाला लाखोंचा महसूल मिळाला आहे.

मुंबईची दुसरी लाईफलाईन म्हणून बेस्ट बसेसची ओळख आहे. त्यात डबलडेकर बसेस म्हणजे मुंबईची शान. बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात ऐकेकाळी ९०० डबलडेकर बसेस होत्या. परंतु कालांतराने डबलडेकर बसेस इतिहास जमा होत गेल्या आणि सद्यस्थितीत बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात ३३ डबलडेकर बसेस आहेत. मुंबईची शान असलेली डबलडेकर बसेसची ओळख कायम रहावी म्हणून बेस्ट उपक्रमाने वातानुकूलित इलेक्ट्रीक डबलडेकर बसेस प्रवाशांच्या सेवेत आणल्या आहेत. सध्या बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात १२ वातानुकूलित इलेक्ट्रीक डबलडेकर बसेस असून ,त्यापैकी चार बसेस हेरिटेज टूर सेवा म्हणून प्रवाशांच्या सेवेत रस्त्यावर धावतात.

‘बेस्ट’ने खास सुरू केलेल्या ‘हेरिटेज टूर’ उपक्रमात विकेण्डला शनिवार-रविवारी छत्रपती शिवाजी महाराज म्युझियमपासून या बस सकाळी ८.४५ वाजल्यापासून दर ३० मिनिटांच्या कालांतराने चालल्या जातात. हेरिटेज टूरमध्ये मुंबईकर पर्यटकांना फोर्ट परिसरातील हेरिटेज वास्तू, इमारती, पुतळे, वास्तू बसमधून पाहता येतात. शिवाय या टूरमध्ये पर्यटकांना ऐतिहासिक वास्तूंवरील आकर्षक रोषणाईदेखील पाहता येते. वाहक नसणाऱ्या या बसमधून प्रवास करण्यासाठी प्रवाशांना १०० टक्के ‘टॅप इन, टॅप आऊट’ सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. म्हणजेच गाडीच्या प्रवासासाठी चलो किंवा ‘बेस्ट’ चलो स्मार्ट कार्ड असणे अनिवार्य आहे. ज्यामध्ये गाडीमध्ये चढताना आणि उतरताना हे कार्ड मशीनमध्ये स्वाइप करावे लागते.

‘हेरिटेज टूर’ बसेस प्रवाशांचे आकर्षण!

-डबल डेकर एसी इलेक्ट्रिक बसमध्ये दोन्ही बाजूने प्रवेशद्वार असल्याने प्रवाशांसाठी मोठी सुविधा मिळते. शिवाय सुरक्षेच्या दृष्टीने बसमध्ये सीसीटीव्हीची सुविधा देण्यात आली आहे.

-बसमधून एकावेळी ९० प्रवासी प्रवास करू शकतात. बसची धावण्याची एकूण क्षमता १८० किमी आहे. ४५ मिनिटांच्या चार्जिंगमध्ये बस १०० किमीपर्यंत धावू शकते.

-बॅटरीला आग लागल्यास, सप्रेशनमुळे निर्माण झालेला धोकाही या मोबिलिटी मॉनिटरच्या साहाय्याने तात्काळ समजणार असून, त्यामुळे संभाव्य धोके टाळता येणार आहेत.

हेरिटेज टूरचा दक्षिण मुंबईतील प्रवास!

छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय - गेट वेऑफ इंडिया, मंत्रालय, मरीन ड्रायव्ह, गिरगाव चौपाटी, विल्सन कॉलेज, चर्चगेट स्टेशन, ओव्हल मैदान, मुंबई उच्च न्यायालय, छत्रपती शिवाजी महाराज स्टेशन, रिझर्व्ह बँक, ओल्ड कस्टम, काळा घोडा, म्युझियम.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in