मुंबई विमानतळावरून १०० कोटींचे हेरॉईन जप्त

मुंबई विमानतळावरून १०० कोटींचे हेरॉईन जप्त

एका ट्रॉली बॅगमध्ये लपवून हे अमली पदार्थ आणले जात होते. या प्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून १६ किलोचे उच्च दर्जाचे हेरॉईन जप्त केले. याची किंमत १०० कोटी आहे. महसूल गुप्तचर महासंचालनालयाने (डीआरआय) ही कारवाई केली. एका ट्रॉली बॅगमध्ये लपवून हे अमली पदार्थ आणले जात होते. या प्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली आहे.

दिल्लीतील एका हॉटेलमधून घानाच्या महिलेला अटक करण्यात आली. तिच्या चौकशीतून हा कट उघडकीस आला. त्यानंतर डीआरआयच्या मुंबई विभागाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सापळा रचला. मालावी येथून कतारमार्गे येणाऱ्या प्रवाशाकडे अमली पदार्थ असल्याची खास टिप मिळाली होती. त्यानंतर डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी विमानतळावर संशयित प्रवाशावर नजर ठेवली व त्याला पकडले. त्याच्या बॅगची झडती घेतली, तेव्हा त्याच्या ट्रॉली बॅगमध्ये हेरॉईन सापडले. या प्रवाशाला अटक डीआरआय कोठडीत ठेवण्याचे आदेश स्थानिक न्यायालयाने दिले. दिल्लीत पकडलेली घानाची महिला हे अमली पदार्थ ताब्यात घेणार होती, असे अधिकारी म्हणाला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in