पैसे देऊन लैंगिक सुख घेणे गुन्हा नाही - हायकोर्ट

नेहरूनगर पोलिसांनी २०२१ मध्ये वेश्याव्यवसाय सुरू असलेल्या ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत आरोपी आमिर नियाझ खानला याला ग्राहक म्हणून अटक केली. त्याच्याविरोधात भारतीय दंड विधानसह पोक्सो आणि अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याच्या कलमांतर्गत गुन्हे दाखल केले. गेली तीन वर्षे तुरुंगात असलेल्या अमीर खानने ॲड. प्रभंजय दवे यांच्यामार्फत उच्च न्यायालयात धाव घेत जामिनासाठी याचिका दाखल केली.
पैसे देऊन लैंगिक सुख घेणे गुन्हा नाही - हायकोर्ट

मुंबई : लैंगिक सुखासाठी पैसे दिले असतील, तर तो गुन्हा नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने देताना वेश्याव्यवसायाच्या ठिकाणी पोलीस कारवाईत वारांगणेकडे आलेल्या ग्राहकाला अटक करता येणार नाही, असे स्पष्ट केले. न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी हा निर्वाळा देताना, नेहरूनगर पोलिसांनी तीन वर्षांपूर्वी वेश्याव्यवसायाच्या ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी पोक्सोअंतर्गत अटक करण्यात आलेल्या आरोपीची जामिनावर सुटका केली.

नेहरूनगर पोलिसांनी २०२१ मध्ये वेश्याव्यवसाय सुरू असलेल्या ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत आरोपी आमिर नियाझ खानला याला ग्राहक म्हणून अटक केली. त्याच्याविरोधात भारतीय दंड विधानसह पोक्सो आणि अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याच्या कलमांतर्गत गुन्हे दाखल केले. गेली तीन वर्षे तुरुंगात असलेल्या अमीर खानने ॲड. प्रभंजय दवे यांच्यामार्फत उच्च न्यायालयात धाव घेत जामिनासाठी याचिका दाखल केली.

या याचिकेवर न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या समोर सुनावणी झाली. यावेळी ॲड. प्रभंजय दवे यांनी पोलिसांनी दाखल केलेल्या भारतीय दंड विधानसह पोक्सो आणि अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याच्या कलमांतर्गत कारवाईला जोरदार आक्षेप घेतला. पोलिसांनी कारवाई करताना खान तेथे आढळून आल्याने त्याला ग्राहक म्हणून आरोपी बनवले होते. परंतु वेश्यागृहातील ग्राहक हा भादंवि कलम ३७०च्या कक्षेत मोडत नाही, असा दावा केला. तसेच पोलिसांनी आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्याखाली गुन्हा दाखल केला; मात्र या वेश्याव्यवसायात मुलगी अल्पवयीन असल्याची कल्पना त्याला नव्हती. विशिष्ट रक्कम दिल्यानंतर महिलांसोबत लैंगिक सुख उपभोगता येईल, असे आमिष दाखवल्यानंतर तो वेश्यागृहात गेला होता. याकडे ॲड. दवे यांनी न्यायालयाचे लक्ष वेधताना यापूर्वी कोलकाता हायकोर्टाने दिलेल्या निर्वाळ्याचा दाखला सादर केला. याची गंभीर दाखल न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी घेतली.

पोक्सोअंतर्गत गुन्ह्यातील आरोपीला जामीन

ॲड. दवे यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून आरोपी आमिर खान हा तीन वर्षे कारागृहात असल्याने २५ हजारांच्या वैयक्तिक जातमुचलका आणि एक किंवा दोन हमीदारांसह सशर्त जामीन मंजूर केला. तसेच खान याला खटला सुरू होईपर्यंत तीन महिन्यांतून पहिल्या सोमवारी संध्याकाळी ५ ते ७ या वेळेत संबंधित पोलीस ठाण्यात हजेरी लावणे. साक्षी पुराव्यात हस्तक्षेप करू नये, आदी अटी न्यायालयाने आदेशात नमूद केल्या आहेत.

न्यायालय म्हणते

  • वेश्याव्यवसायाच्या ठिकाणी ग्राहक म्हणून आढळल्यानंतर पोलिसांनी खानला आरोपी बनवले होते. तथापि, वेश्यागृहातील ग्राहक हा भादंवि कलम ३७० च्या कक्षेत मोडत नाही, असा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला.

  • पैसे देऊन लैंगिक सुख उपभोगणे हा गुन्हा नसून यासाठी पैसे मोजणारा व्यक्ती अर्थात ग्राहक आरोपी नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला.

  • वेश्याव्यवसायाच्या ठिकाणी ग्राहकाला आरोपी म्हणून अटक करणे ही बेकायदेशीर आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in