धावती ट्रेन पकडताना झालेला मृत्यू हा अपघातच! उच्च न्यायालयाने केले स्पष्ट

फलाटाच्या विरुद्ध दिशेने मेल एक्स्प्रेस पकडताना पडून झालेला मृत्यू हा अपघातच, असे स्पष्ट करीत उच्च न्यायालयाने पीडित कुटुंबीयांना दिलासा दिला.
धावती ट्रेन पकडताना झालेला मृत्यू हा अपघातच! उच्च न्यायालयाने केले स्पष्ट
धावती ट्रेन पकडताना झालेला मृत्यू हा अपघातच! उच्च न्यायालयाने केले स्पष्ट प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

मुंबई : फलाटाच्या विरुद्ध दिशेने मेल एक्स्प्रेस पकडताना पडून झालेला मृत्यू हा अपघातच, असे स्पष्ट करीत उच्च न्यायालयाने पीडित कुटुंबीयांना दिलासा दिला. न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या एकलपीठाने अनुचित घटनेची व्याख्या या अपघाताला लागू होत नसल्याने पीडिताच्या कुटुंबाला नुकसानभरपाई देता येणार नसल्याचा रेल्वे प्रशासनाचा दावा फेटाळून लावत पीडित कुटुंबाला ४ लाख नुकसानभरपाई देण्याचे आदेश रेल्वे प्रशासनाला दिले.

लक्ष्मण राठोड आपल्या कुटुंबासह एक्स्प्रेस मेलने प्रवास करत होते. त्यावेळी एका स्थानकावर लघुशंकेसाठी राठोड फलाटाच्या विरुद्ध दिशेने मेलमधून उतरले. मात्र अचानक ट्रेन सुरू झाली, तेव्हा धावती ट्रेन पकडताना त्यांचा तोल गेला आणि ते खाली पडून ट्रेनखाली आले, ज्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

रेल्वे प्रशासनाने या अपघातात संपूर्णपणे त्या व्यक्तीचीच चूक असल्याचा ठपका ठेवत राठोड कुटुंबाला नुकसानभरपाई नाकारली. त्याविरोधात पीडिताच्या कुटुंबाने मुंबई उच्च न्यायालयाच दार ठोठावले होते.

logo
marathi.freepressjournal.in