AI च्या मदतीने बनवले कोर्टाचे निर्णय... एनएफएसीच्या अधिकाऱ्याला उच्च न्यायालयाने फटकारले

एनएफएसीच्या अधिकाऱ्याने एका कंपनीकडून २७.९१ कोटींच्या कराची मागणी करताना एआयच्या सहाय्याने बनावट न्यायालयीन निर्णय तयार केले होते. त्याची गंभीर दखल घेत न्यायालयाने अधिकाऱ्याला कडक शब्दांत फटकारले.
मुंबई उच्च न्यायालय (संग्रहित छायाचित्र)
मुंबई उच्च न्यायालय (संग्रहित छायाचित्र)
Published on

मुंबई : एआयचा वापर करुन तयार केलेल्या न्यायालयीन निर्णयांचा संदर्भ देणाऱ्या नॅशनल फेसलेस असेसमेंट सेंटरच्या (एनएफएसी) मूल्यांकन अधिकाऱ्याला उच्च न्यायालयाने दणका दिला.

एनएफएसीच्या अधिकाऱ्याने एका कंपनीकडून २७.९१ कोटींच्या कराची मागणी करताना एआयच्या सहाय्याने बनावट न्यायालयीन निर्णय तयार केले होते. त्याची गंभीर दखल घेत न्यायालयाने अधिकाऱ्याला कडक शब्दांत फटकारले.

केएमजी वायर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने २७ मार्च २०२५ रोजीच्या करनिर्धारण वर्ष २०२३-२४ साठीच्या करनिर्धारण आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. कंपनीच्या याचिकेवर न्यायमूर्ती बी. पी. कोलाबावाला आणि न्यायमूर्ती अमित जामसंडेकर यांच्या खंडपीठा समोर सुनावणी झाली. याचिकाकर्त्या कंपनीने एकूण उत्पन्न ३.०९ कोटी रुपये इतके घोषित केले होते. वास्तविक कंपनीचे मूळ उत्पन्न २७.९१ कोटी रुपये इतके होते.

logo
marathi.freepressjournal.in