हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा मीरा- भाईंदरमध्ये पर्दाफाश

६ पीडित मुलींची सुटका करून त्यांना महिला सुधारगृहात पाठवण्यात आले आहे
हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा मीरा- भाईंदरमध्ये पर्दाफाश

भाईंदर : मीरा- भाईंदरमधील अनैतिक वाहतूक प्रतिबंध कक्षाने एका हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. ही महिला मुलींना इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांमध्ये व डान्स शोमध्ये काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून वेश्याव्यवसाय करून घेत होती. एका दलाल महिलेसह दोन जणांना अटक करण्यात आली आहे, तर पोलिसांनी तिच्या तावडीतून सहा तरुणींची सुटका केली आहे. एक महिला दलाल मुलींना इव्हेंट्स आणि डान्स शो मध्ये काम मिळवून देण्याच्या नावाखाली वेश्याव्यवसायाचा घृणास्पद व्यवसाय करत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे पोलीस निरीक्षक समीर अहिराव यांना मिळाली होती. त्यानुसार समीर अहिरराव यांनी पथकासह फाउंटन हॉटेल, वरसावे येथे सापळा रचला. ती महिला एका कारमधून मुलींना घेऊन आली असता, तिला व सहा मुली व एक पुरुष दलाल यांना ताब्यात घेण्यात आले. महिला दलाल ही गोवा, महाबळेश्वर, पुणे, लोणावळा, इगतपुरी, गुजरात, दमण, मुंबई, ठाणे, मीरा -भाईंदर येथे वेश्याव्यवसायासाठी मुली पुरवण्याचा व्यवसाय करत होती. पोलिसांनी डान्स शो आणि इव्हेंटच्या नावाखाली चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या महिला दलाल नंदिनी वडारी (३३) व राजेश नागदेव उर्फ ​​विक्की (३८) या दोघांना अटक करून त्यांच्या विरुद्ध काशिमीरा पोलीस ठाण्यात पिटा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर एक पुरुष दलाल फरार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in