दादर येथील अतिधोकादायक इमारती रिकाम्या करण्यास सुरु

मुंबईतील धोकादायक इमारती पाडण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे.
दादर येथील अतिधोकादायक इमारती  रिकाम्या करण्यास सुरु

दादर येथील शंकर घाणेकर मार्गावरील अतिधोकादायक बनलेल्या जनार्दन अपार्टमेंट या सोसायटीमधील सहा इमारती शुक्रवार २४ व शनिवार, २५ जूनला पाडण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. मात्र, रहिवासी आपले घर खाली करत नसल्यामुळे सोमवार २७ जूनपासून ही कारवाई करण्यात येणार आहे. सध्या ए इमारतीत रहिवासी नसल्याने त्यातीत आतील बाजूवर हातोडा मारण्यात आल्याचे जी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी सांगितले.

मुंबईतील धोकादायक इमारती पाडण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. मात्र, अशा इमारती रहिवासी रिकाम्या करत नसल्यामुळे कारवाईमध्ये अडथळा निर्माण येत आहे. दादरमधील जनार्दन अपार्टमेंट मधील ए, बी,सी,डी, ई आणि जी या सहा इमारती अतिधोकादायक असल्यामुळे पालिकेने या इमारतीमधील मालक आणि रहिवाशांना नोटीस बजावली होती. त्यानुसार या इमारतीतील रहिवाशांनी आपल्या सदनिका तातडीने खाली करण्याचे निर्देशही देण्यात आले होते. धोकादायक असलेल्या सहा इमारतीमध्ये ११५ सदनिका असून यात ५७५ रहिवासी वास्तव्यास होते. इमारती धोकादायक बनल्यामुळे इमारतींमधील सुमारे २०५ रहिवाशांनी टप्प्याटप्प्याने घर रिकामे केले. मात्र, आजही या इमारतींमधील ७४ सदनिकांमध्ये ३७० रहिवासी वास्तव्यास आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in