नाइट फ्रँक इंडियामध्ये पहिल्‍यांदाच उच्‍चांकी विक्री

नाइट फ्रँक इंडियाने त्‍यांचा पहिल्या सहामाहीविषयक नवीन अहवाल ‘इंडिया रिअल इस्‍टेट’ बुधवारी जाहीर केला
 नाइट फ्रँक इंडियामध्ये पहिल्‍यांदाच उच्‍चांकी विक्री
Published on

चालू वर्ष २०२२च्या पहिल्‍या सहामाहीत मुंबईमध्‍ये ४४,२०० सदनिकांची विक्री झाली असून ही वार्षिक ५५ टक्‍के वाढ आहे. मुंबईतील निवासी बाजारपेठेमध्ये २०२१ च्‍या पहिल्‍या सहामाहीमधील २८,६०७ सदनिकांची विक्री झाली होती. पहिल्या सहामाहीतील विक्री पाहता गेल्या १० वर्षांत पहिल्‍यांदाच उच्‍चांकी विक्री झाल्याचे नाइट फ्रँक इंडियाने आपल्या अहवालात म्हटले आहे.

नाइट फ्रँक इंडियाने त्‍यांचा पहिल्या सहामाहीविषयक नवीन अहवाल ‘इंडिया रिअल इस्‍टेट’ बुधवारी जाहीर केला. ओमीक्रॉनची भिती, मेट्रो उपकराची अंमलबजावणी, इनपुट खर्चाचा दबाव आणि बँकाकडून व्याजदरात झालेली वाढ अशा आव्‍हानात्‍मक काळात देखील विक्री वाढल्याने निवासी बाजारपेठेची स्थिरता दिसून आली. प्रबळ विक्री गतीचा अधिक लाभ घेत विकासकांनी बाजारपेठेत नवीन पुरवठ्याची भर केली, ज्‍यामुळे सादर करण्‍यात आलेल्‍या नवीन सदनिकांमध्‍ये वार्षिक ३२ टक्‍क्‍यांच्‍या वाढीसह २०२१च्‍या पहिल्‍या सहामाहीमधील ३५,८७२ युनिट्सवरून २०२२ च्‍या पहिल्‍या सहामाहीत ४७,४६६ युनिट्सपर्यंत वाढ झाली.

नाइट फ्रँक इंडियाचे अध्‍यक्ष व व्‍यवस्‍थापकीय संचालक शिशिर बैजाल म्‍हणाले, बांधकाम खर्चामध्‍ये वाढ आणि प्रबळ गृहनिर्माण मागणीमुळे विकासकांनी सदनिकांच्‍या किंमती वाढवल्‍या. शहरामध्‍ये वार्षिक ६ टक्‍क्‍यांची वाढ दिसण्‍यात येण्‍यासोबत मुंबईतील सदनिकाच्‍या सरासरी किंमतीने २०२१ च्‍या पहिल्‍या सहामाहीमधील प्रति चौरस फूट ६,७५० रूपयांवरून २०२२ च्‍या पहिल्‍या सहामाहीत प्रति चौरस फूट ७,१६३ रूपयांची नोंद केली. तिकिट आकार ५ दशलक्ष रूपये (५० लाख रूपये) व त्‍यापेक्षा कमी असलेल्‍या परवडणा-या गृहनिर्माण विभागाने २०२२ च्‍या पहिल्‍या सहामाहीत एकूण सदनिका विक्रींमध्‍ये निम्‍मे योगदान दिले. तिकिट आकार १० दशलक्ष रूपयांपेक्षा अधिक (१ कोटी रूपये व त्‍यापेक्षा अधिक) असलेल्‍या उच्‍चस्‍तरीय गृहनिर्माण विभागाने २०२१ च्‍या पहिल्‍या सहामाहीमधील १७ टक्‍क्‍यांवरून २०२२ च्‍या पहिल्‍या सहामाहीत २८ टक्‍क्‍यांपर्यंत वाढीची नोंद केली.

logo
marathi.freepressjournal.in