मुंबईतील कुलाब्यात सर्वाधिक पावसाची नोंद ; चर्चगेट परिसर जलमय

त्यानंतर सीएसएमटी आणि नरिमन पॉईंट परिसरात सर्वात जास्त पावसाची नोंद झाली आहे
मुंबईतील कुलाब्यात सर्वाधिक पावसाची नोंद ; चर्चगेट परिसर जलमय
ANI

राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. मुंबईत गेल्या २४ तासात कुलाबा परिसरात सर्वाधिक पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यानंतर सीएसएमटी आणि नरिमन पॉईंट परिसरात सर्वात जास्त पावसाची नोंद झाली आहे. यामुळे चर्चगेट परिसर जलमय झाल्याचं दिसून आलं.

मुंबईत बुधवार पासून मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यात बुधवारी रात्री आठ वाजेनंतर अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता. महापालिकेच्या पर्जन्यमापक यंत्रावरील नोंदणीनुसार गेल्या २४ तासात दक्षिण मुंबईत सर्वाधिक पाऊस पडला आहे. चर्चगेट जवळील कुलाबा, सीएसएमटी, नरिमन पॉईंट या भागात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.

हवामान विभागाची मुंबईत फक्त कुलाबा आणि सांताक्रूझ परिसरात हवामानदर्शक यंत्रे आहेत. मात्र, गेल्या काही वर्षात मुंबई महापालिकेने तब्बल ६० ठिकाणी अशी स्वयंचलित यंत्रे उभारली आहेत. त्यामुशे या ठिकाणी किती पाऊस पडला याची माहिती विभागवार उपलब्ध होत आहे. त्यानुसार मुंबईतील कुलाबा परिसरात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. यामुळे चर्चगेट परिसर जलमय झाला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in