काळाघोडा महोत्सव होणार; हायकोर्टाकडून मिळाली सशर्त परवानगी: आयोजकांनी दिली 'ही' हमी

मुंबईच्या विकास आराखड्यानुसार क्रॉस मैदान हे क्रीडांगण आहे.
काळाघोडा महोत्सव होणार; हायकोर्टाकडून मिळाली सशर्त परवानगी: आयोजकांनी दिली 'ही' हमी

मुंबई : मुंबईतील सुप्रसिद्ध काळाघोडा कला व सांस्कृतिक महोत्सवाच्या आयोजकांना मुंबई हायकोर्टाने मंगळवारी दिलासा दिला. न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठाने मैदानावर अल्पोपहार अथवा इतर व्यावसायिक स्टॉल्स लावणार नाही, अशी हमी आयोजकांनी दिल्यानंतर दक्षिण मुंबईतील चर्चगेट येथील क्रॉस मैदानावर २० ते २८ जानेवारी या कालावधीत काळाघोडा महोत्सव आयोजित करण्यास सशर्त परवानगी दिली.

मुंबईच्या विकास आराखड्यानुसार क्रॉस मैदान हे क्रीडांगण आहे. त्यामुळे न्यायालयाची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय कोणत्याही त्रयस्थ व्यक्तीला क्रॉस मैदान देण्यास मुंबई हायकोर्टाने यापूर्वी मुंबई जिल्हाधिकाऱ्यांना मज्जाव केला आहे. त्या पार्श्वभूमीवर काळाघोडा महोत्सव आयोजक काळाघोडा आर्ट असोसिएशनने क्रॉस मैदानावर २० ते २८ जानेवारी या कालावधीत काळाघोडा महोत्सव आयोजित करण्यास परवानगी द्या, अशी विनंती करणारी याचिका दाखल केली. याची दखल घेत खंडपीठाने महोत्सवासाठी सशर्त परवानगी दिली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in