भारतीय नौदलाच्या महिलांची ऐतिहासीक कामगिरी

महिला अधिकाऱ्यानी डॉनिर्यर २२८ विमानांतून उत्तर अरबी समुद्रात स्वतंत्र टेहळणी आणि देखरेख मोहीम पूर्ण करत इतिहास रचला
भारतीय नौदलाच्या महिलांची ऐतिहासीक कामगिरी

भारतीय नौदलाच्या पाच महिला अधिकाऱ्यांनी ऐतिहासीक कामगिरी केली आहे. पोरबंदर येथील नेव्हल एअर एन्क्लेव्हस्थित भारतीय नौदलाच्या आयएनएएस ३१४ च्या या महिला अधिकाऱ्यानी डॉनिर्यर २२८ विमानांतून उत्तर अरबी समुद्रात स्वतंत्र टेहळणी आणि देखरेख मोहीम पूर्ण करत इतिहास रचला. विशेष म्हणजे या पथकात सर्व महिला होत्या. महिलांची अशा प्रकारे स्वतंत्रपणे राबवलेली ही पहिलीच मोहीम होती.

लेफ्टनंट कमांडर आंचल शर्मा यांच्या नेतृत्वाखाली पथकात वैमानिक लेफ्टनंट शिवांगी आणि लेफ्टनंट अपूर्वा गिते, टेक्टिकल अँड सेन्सर अधिकारी लेफ्टनंट पूजा पांडा आणि सब लेफ्टनंट पूजा शेखावत होत्या. आयएनएएस ३१४ हे गुजरातमधील पोरबंदर येथे तैनात असलेले नौदलाचे आघाडीचे हवाई पथक असून अत्याधुनिक डॉर्नियर २२८ सागरी टेहळणी विमानाचे परिचालन करते. या हवाई पथकाचे नेतृत्व कुशल नेव्हिगेशन इन्स्ट्रक्टर असलेल्या कमांडर एस. के. गोयल यांच्याकडे आहे.

या ऐतिहासिक मोहिमेपूर्वी महिला अधिकाऱ्यांना अनेक महिन्यांचे प्रशिक्षण देण्यासह मोहिमेचे बारकावे सांगण्यात आले होते. भारतीय नौदल सशस्त्र दलांमध्ये परिवर्तन घडवून आणण्यात आघाडीवर आहे. महिला सशक्तीकरणाच्या या प्रभावी आणि अग्रगण्य उपक्रमांमध्ये महिला वैमानिकांची भर्ती, हेलिकॉप्टर परिचालनात महिला हवाई संचालन अधिकाऱ्यांची निवड आणि २०१८ मध्ये सर्व महिला असलेल्या पथकाची सागरी जगपरिक्रमा यांचा समावेश आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in