वंचितांच्या विकासात प्रबोधनकारांचे ऐतिहासिक योगदान - डॉ. नीलम गोऱ्हे

अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प अर्पण करून अभिवादन केले
वंचितांच्या विकासात प्रबोधनकारांचे ऐतिहासिक योगदान - डॉ. नीलम गोऱ्हे
Published on

मुंबई : प्रबोधनकार ठाकरे हे महाराष्ट्राला पुरोगामी विचारांचे वळण देणारे नेते होते. प्रबोधनकारांच्या विचारांची आजही समाजाला गरज आहे. विशेषतः समाजातील स्त्रियांना, उपेक्षितांना आणि वंचित घटकांना प्रगतीचा अधिकार मिळावा, याकरिता प्रबोधनकारांचे विचार हे ऐतिहासिक योगदान असल्याची भावना डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केली.

केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती विधान भवनात साजरी करण्यात आली. याप्रसंगी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रबोधनकारांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी, विलास आठवले विधिमंडळ सचिव, ऋतुराज कुडतरकर उपसचिव, संतोष उडतेवार विशेष कार्य अधिकारी, विजय काळे कक्ष अधिकारी यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प अर्पण करून अभिवादन केले.

logo
marathi.freepressjournal.in